शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
2
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
3
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
4
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
5
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
6
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
7
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
8
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
9
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
10
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
11
शतांक विपरीत राजयोग: ९ राशींना वक्री शनिचे वरदान, सुबत्ता भरभराट; भरघोस लाभ, शुभ कल्याण होईल!
12
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
13
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
14
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
15
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
16
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
17
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
18
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
19
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
20
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती

पिंपरीत वाहतुकीवर ३०० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा ‘वाॅच’; ५ लाख ६९ हजारांचा दंड वसूल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2020 14:22 IST

वाहतूक नियमांचे उल्लंघन करणे पडले महागात

ठळक मुद्दे१८२५ वाहनचालकांना ५ लाख ६९ हजारांचा दंडस्मार्ट सिटी अंतर्गत शहरात ‘सेफ सिटी’ हा उपक्रम राबविण्यात येणार

नारायण बडगुजर-पिंपरी : सिग्नल जंपिंग, झेब्रा क्राॅसिंगवर वाहन थांबवणे, नो एण्ट्रीतून वाहन नेणे अशा पद्धतीने वाहतूक नियमांचे उल्लंघन करणे महागात पडत आहे. पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या वाहतूक शाखेकडून सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून ही कारवाई करण्यात येत आहे. महिन्याभरात १८२५ बेशिस्त वाहनचालकांना पाच लाख ६९ हजारांचा दंड आकारण्यात आला आहे.

स्मार्ट सिटी अंतर्गत शहरात ‘सेफ सिटी’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. त्या अंतर्गत वाहतूक सुरळीत करण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. त्यानुसार शहरातील मुख्य चाैक, रस्ते आदी ठिकाणी अद्ययावत तीन हजार सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे प्रस्तावित आहे. महापालिका, पोलिसांची वाहतूक शाखा यांचा या उपक्रमात सहभाग आहे. या पार्श्वभूमीवर वाहतूक पोलिसांनी वाहतूक सुरळीत करण्यासाठी विविध उपाययोजनांवर भर दिला आहे. 

शहरात ठिकठिकाणी ३०० सीसीटीव्ही कॅमेर बसविण्यात आले आहेत. यात ३३ ‘पॅन टील्ट झूम’ २४ ऑटोमेटिक नंबर प्लेट रिकग्निशन (एएनपीआर) अर्थात वाहन क्रमांक तपासणी करणारे कॅमेरे तसेच २४३ फिक्स्ड कॅमेऱ्यांचा समावेश आहे. वाहतूक शाखेच्या चिंचवड येथील नियंत्रण कक्षाशी या कॅमेऱ्यांना कनेक्ट करण्यात आले आहे. चार कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली असून, त्यांच्याकडून सीसीटीव्हीच्या माध्यमातून शहरातील वाहतुकीवर ‘वाॅच’ ठेवला जात आहे. 

सीसीटीव्ही कक्षातील पोलीस कर्मचारी हे स्क्रीनवरील कॅमेऱ्यावर लक्ष ठेवून असतात. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांबाबत संबंधित पाॅईंटवरील पोलीस कर्मचाऱ्याला वायरलेसव्दारे संदेश दिला जातो. त्यानुसार संबंधित कर्मचारी बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करतात. तसेच कारवाईबाबत सीसीटीव्ही कक्षाला माहिती देतात.

...या कारणास्तव होते कारवाईराॅंग साईडझेब्रा क्राॅसिंगसिग्नल जंपिंगडबल पार्किंगनो एण्ट्रीनो पार्किंगट्रिपल सिटविनामास्क

वाहतूक शाखेच्या सीसीटीव्ही कक्षातून नोव्हेंबरमध्ये झालेली कारवाईदेण्यात आलेले काॅल : ४०२केलेल्या केसेस : १८२५आकारलेला दंड : ५ लाख ६९ हजार रुपये 

कारवाई वाढल्याने झालेले बदल - सिग्नलला झेब्रा क्राॅसिंगवर वाहन थांबविण्याचे प्रमाण कमी झाले- सिग्नल जंपिंगचे प्रकार घटले- वाहने व्यवस्थित पार्किंग करण्याला प्राधान्य- विरुध्द दिशेने वाहने चालविण्याचे प्रमाण घटले- वाहनचालविताना मास्कचा वापर वाढला- प्रतिबंध केल्याने सिग्नलवरील वस्तू विक्रेते व भिकाऱ्यांचे प्रमाण झाले कमी

वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. सीसीटीव्ही कॅमेरे तसेच इतर तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर भर आहे. वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे. यातून प्रदूषण तसेच अपघात कमी होण्यास मदत होईल. - श्रीकांत डिसले, सहायक पोलीस आयुक्त, वाहतूक शाखा, पिंपरी-चिंचवड

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडtraffic policeवाहतूक पोलीसTrafficवाहतूक कोंडीcctvसीसीटीव्ही