शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
3
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
4
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
5
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
6
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
7
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
8
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
9
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
10
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
11
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
12
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
13
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
14
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."
15
मिस्त्री, प्लंबर, फिटरपासून कनिष्ठ अभियंतापर्यंत; मिरा-भाईंदर महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती
16
आता त्या गोष्टीवर मी काहीच बोलणार नाही; सचिन-द्रविड अन् MS धोनीचं नाव घेत पुजारा म्हणाला की,..
17
आईस्क्रीम विक्रेत्याला कॉलेज प्लेसमेंटमधून १.८ कोटींचं पॅकेज? व्हायरल Video मागचं 'सत्य'
18
सासू केस ओढून मारायची, पती हुंडा घेऊन...; निक्कीच्या आईने जावयाबद्दल केला धक्कादायक खुलासा!
19
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
20
दुसरे घर घेण्याचा विचार करताय? आधी ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी तपासा, अन्यथा होईल मोठं नुकसान!

वॉर्डातील कामांना आला जोर

By admin | Updated: April 15, 2016 03:41 IST

महापालिका निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपली असून, इच्छुक गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत. आपल्या वॉर्डातील अधिकाधिक कामे व्हावीत, यासाठी नगरसेवकांची धावपळ

पिंपरी : महापालिका निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपली असून, इच्छुक गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत. आपल्या वॉर्डातील अधिकाधिक कामे व्हावीत, यासाठी नगरसेवकांची धावपळ सुरू आहे. त्यामुळे स्थायी पुढेदेखील वॉर्डातील छोट्या कामांचे प्रस्ताव येण्याचे प्रमाण वाढले आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेत एकहाती सत्ता आणण्याची ‘हॅट्ट्रिक’ साधण्यासाठी राष्ट्रवादी काँगे्रसने तयारी आहे. निवडणुकीवेळी नागरिकांसमोर जाताना अडचणी येऊ नये, यासाठी वॉर्डातील अधिकाधिक कामे करण्यास प्राधान्य दिले जात आहे. पेव्हिंग ब्लॉक टाकणे, रस्ते दुरुस्ती, जलवाहिनी दुरुस्ती अशा छोट्या कामांकडेही लक्ष दिले जात आहे. त्यामुळे स्थायी समितीसमोरदेखील सध्या मोठ्या कामांसह अगदी छोट्या कामांचेही प्रस्ताव येण्याचे प्रमाण वाढले आहे. निवडणुकीपूर्वी वॉर्डातील कामे पूर्ण होण्यासाठी स्थानिक नगरसेवकांनी जोर लावला आहे. अंदाजपत्रकातही वॉर्डासाठी अधिकाधिक तरतूद करण्यासाठी नगरसेवकांचा आटापिटा पाहायला मिळाला. पेव्हिंग ब्लॉक आणि गल्लीबोळातील रस्त्यांच्या दुरुस्तीबाबत अनेक ठिकाणी ओरड असते. ही कामे केल्यास नागरिकांशी जोडले जातात. यामुळे नगरसेवकांनी वॉर्डातील छोटी कामे करण्याकडे जोर दिला आहे. मंगळवारी झालेल्या स्थायी समिती सभेच्या विषयपत्रिकेवरदेखील वॉर्डातील छोट्या-छोट्या कामांशी संबंधित असलेल्या कामांचाच समावेश होता. थेरगावातील लक्ष्मणनगर, गणेशनगर परिसरात नवीन पाइपलाइन टाकणे, प्रभाग क्रमांक चारमधील महात्मा फुलेनगर ते नेवाळे वस्ती येथील रस्त्यांसह कृष्णानगर येथील रस्त्यांचे डांबरीकरण करणे, बोपखेलमधील रस्ते विकसित करणे, अभ्यासिका, व्यायामशाळा व बाह्यरुग्ण विभागातील फर्निचर बनविणे आदी खर्चास मान्यताही दिली. (प्रतिनिधी)महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक असलेले मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करीत आहेत. यासह सतत संपर्कात राहण्यासाठी सोशल मीडियावरील मेसेज यांचा मारा सुरू आहे. तर नगरसेवकांनी मात्र वॉर्डातील छोटी-छोटी कामे करण्याकडे लक्ष दिल्याचे दिसून येत आहे. शिवाय, हे काम आपल्याच माध्यमातून कसे मार्गी लागले, याबाबतही सांगण्याचा प्रयत्न केला जातो. एखादे काम जरी झाले, तरी त्याचे फलकही उभारले जात आहे. एरवी वारंवार तक्रार करूनही त्याची दखल घेतली जात नसल्याचे अनुभव नागरिकांना येतात. तक्रार मांडण्यासाठी नगरसेवकांची भेट होणेही कठीण असते. मात्र, जसजशी निवडणूक जवळ येत आहे, तसतशी नागरिकांच्या तक्रारींची नगरसेवकांकडून तातडीने दखल घेतली जात आहे. वॉर्डातील छोटी कामेदेखील यामुळे मार्गी लागत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.