शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

भुलेश्वर वनक्षेत्रातील ओढ्या-नाल्यांतून वाळूतस्करी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2018 23:52 IST

वनविभागाचे दुर्लक्ष : वनसंपत्ती धोक्यात, यंत्राच्या साह्याने होतोय उपसा

यवत : दौंड तालुक्यातील वाळूमाफियांच्या नजरा नदीपत्रांमधून गावागावांतील ओढे, नाले, गाव तलाव यानंतर आता डोंगर दऱ्यांपर्यंत पोहोचल्या आहेत. भुलेश्वर पायथ्यालगत वनविभागाचे क्षेत्रात वनसंपदेचे नुकसान व डोंगर उतारावर यांत्रिक सामग्रीने ओढ्या नाल्यात उत्खनन करून शेकडो ब्रास वाळूची तस्करी करण्यात आली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात वन विभागाच्या क्षेत्रात उत्खनन झाल्यानंतरही या प्रकाराबाबत वनविभाग अनभिज्ञ आहेत.

जिल्ह्यातील प्रसिद्ध देवस्थान श्री क्षेत्र भुलेश्वर मंदिराच्या जवळ असलेल्या घाटात वाळूची तस्करी करण्यात आली आहे. भुलेश्वर घाटात वन विभागाचे शेकडो हेक्टर क्षेत्र आहे. या वन क्षेत्रात वन्य जीवदेखील मोठ्या आढळून येतात. मात्र, या वन क्षेत्रात आवश्यक काळजी वन विभागाकडून घेतली जात नसल्याचे समोर येत आहे. सुमारे दीड ते दोन किलोमीटर लांबपर्यंत डोंगर दºयांमधून उत्खनन होऊनही वनविभागाला याची कल्पनाही नाही. वाळू तस्करी झालेल्या भागात वृक्षांची तोडदेखील करण्यात आली आहे. मागील अनेक दिवसांपासून वनक्षेत्रात मोठे नुकसान केल्याचे दिसून येत आहे. वाळूच्या तस्करीबरोबर वाळूतस्करांनी आणखी कशा कशाची तस्करी येथून केली असेल, याची आता चौकशी होण्याची आवश्यकता आहे. वाळू तस्करीबरोबर या भागात असणारी हरणे, काळवीट आदी प्राण्यांच्या बाबतीत काही घडले आहे का, याचीही शहानिशा होणे आवश्यक आहे.वाळूतस्करांमुळे वृक्षलागवड मोहीम धोक्यात४शासनाने सामाजिक वनीकरणसाठी मोठ्या प्रमाणात शासकीय निधी खर्च केला आहे. वन्य प्राण्यांचे संरक्षण, वृक्षलागवड आदी पर्यावरणाच्या पूरक गोष्टींसाठी वर्षानुवर्षे मोठ्या प्रयत्नाने वन्यप्राणी, झाडे संवर्धन उपक्रम राबविण्यात आले आहेत. मात्र वाळूतस्करांमुळे शासनाचा उपक्रम संपुष्टात येत आहे. भुलेश्वरच्या डोंगरदºयांना विशेष इतिहास आहे. उत्कृष्ट शिल्पकलेचा अनोखा ठेवा असलेले शंभो महादेवाचे मंदिर डोंगरांच्या सर्वोच्च ठिकाणी आहे.४याचबरोबर येथील डोंगरदºयांचे संवर्धन करण्यासाठी विविध सामाजिक संघटना व तरुणाचे समूह काम करीत आहेत. यवतमधील काही तरुणांनी एकत्र येत शेकडो वृक्षांची लागवड करण्याबरोबरच सुटीच्या वेळी वेळ काढून लावलेल्या वृक्षांचे संवर्धन करण्याची मोहीम मागील काही वर्षांपासून चालू ठेवल्याने येथे वृक्षांची संख्या वाढली आहे. मात्र, शासनाच्या वन विभागाकडून काळजी घेतली जात नसल्याने येथे वाळूतस्करांचे चांगलेच फावले आहे.४भुलेश्वरच्या डोंगर दºयात वाळूसाठी मोठे उत्खनन४वन विभागाच्या हद्दीत उत्खनन होत असताना वन विभाग मात्र झोपेत४सुमारे ५०० ट्रक वाळूची चोरी४वन विभागाच्या हद्दीत वृक्षतोडीबरोबरच वन्य जीवही धोक्यात४वनांच्या हद्दीतून बेकायदा रस्ते 

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड