शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
2
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
3
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
4
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
5
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
6
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
7
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
8
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
9
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
10
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
11
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
12
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
13
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
14
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
15
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
16
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
17
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
18
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
19
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
20
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा

पोलीस ठाण्याला हक्काच्या जागेची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2018 3:04 AM

महापालिकेच्या गाळ्यांमध्ये होते कामकाज; अधिकाऱ्यांनी केल्या काही सुधारणा

सांगवी : अनेक समस्यांमुळे सांगवी पोलीस ठाण्यात असुविधा होत्या. त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत होते. याबाबत ‘लोकमत’ने सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेत सांगवी पोलीस ठाण्यामध्ये अनेक सुधारणा करण्यात आल्या आहेत. त्यामुळे या पोलीस ठाण्याने कात टाकली आहे.पिंपरी-चिंचवड शहरात आयुक्तालय कार्यान्वित झाल्यानंतर शहरातील पोलीस ठाण्यांमधील विविध सुधारणांवर भर देण्यात येत आहे. विशालनगर, जगताप डेअरी, पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव, नवी सांगवी व जुनी सांगवी असा सुमारे २५ चौरस किलोमीटरचा परिसरसांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येतो. पोलीस ठाण्यात मूलभूत सुविधा नव्हत्या. त्याची ‘लोकमत’ पाहणी करण्यात येऊन या समस्यांबाबत सविस्तर वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते.सांगवी पोलीस ठाण्यांतर्गत पिंपळे सौदागर, जुनी सांगवी, तसेच नवी सांगवी पोलीस चौकी अशा तीन पोलीस चौकी आहेत. त्यात १ वरिष्ठ पोलीस निरीक्षक, २ पोलीस निरीक्षक, ४ सहायक निरीक्षक, ६ उपनिरीक्षक, ११ सहायक उपनिरीक्षक, १७ हवालदार, ४० पोलीस नाईक,४९ पोलीस शिपाई असा १३० पोलीस ताफा असलेल्या कर्मचाºयांमध्ये ३० महिला पोलीस कर्मचारी व अधिकारी आहेत.अंदाजे २५ चौरस किलोमीटर परिसरात सांगवी पोलीस ठाण्याची हद्द आहे. सांगवीत औंध हा सगळ्यात कमी अंतर, तर जगताप डेअरी,पिंपळे सौदागर हा जास्त अंतर असलेला परिसर या पोलीस ठाण्यांतर्गत येतो. सांगवी पोलीस ठाण्याचा नव्याने पदभार स्वीकारलेले वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोहन शिंदे यांनी पोलीस आयुक्तालय झाल्यानंतर काही महिन्यांतच पोलीस ठाण्याचे रुपडे पालटण्यासाठी येथील पार्किंग परिसरात पेव्हिंग ब्लॉक बसविण्यात आले आहेत.गैैरसोय : आठ गाळ्यांत विभागले कार्यालयमहापालिकेच्या व्यावसायिक आठ गाळ्यांत सांगवी पोलीस ठाण्याचे कामकाज चालते. १५० चौरस फुटांचा एक गाळा आहे. अशा आठ गाळ्यांमध्ये पोलिसांना काम करावे लागते. या ठाण्यासाठी स्वमालकीची जागा नाही. त्यामुळे अशा पद्धतीने कामकाज सुरू आहे. ठाण्याला हक्काची जागा उपलब्ध होईल, अशी येथील पोलिसांना प्रतीक्षा आहे.नवीन पोलीस ठाण्याची मागणीसांगवी पोलीस ठाण्यात आणखी मुनष्यबळाची गरज आहे. लोकसंख्येची घटना जास्त असल्याने या ठाण्यावर कामाचा ताण येत आहे. यावर उपाययोजना होणे आवश्यक आहे. पिंपळे निलख आणि पिंपळे गुरव भागासाठी नवीन पोलीस ठाण्यांची मागणी करण्यात येत आहे. पिंपळे गुरव व पिंपळे निलख हा परिसर मोठ्या लोकसंख्येचा असल्याने येथे पोलीस ठाणे असणे गरजेचे आहे. पिंपळे सौदागर येथे शिवार चौक अथवा कोकणे चौकात पोलीस ठाण्याची नागरिकांकडून मागणी करण्यात येत आहे.जप्त वाहने हलविलीवर्षानुवर्षे पडून असलेल्या जप्त वाहनांची विल्हेवाट लावण्यासाठी प्रयत्न होत आहेत. ही सर्व वाहने येथून हटविण्यात आली आहेत. त्यामुळे हा परिसर स्वच्छ व शोभिवंत करण्यास जागा उपलब्ध झाली आहे. पार्किंगची जागा मोकळी जागा झाल्याने पोलीस ठाण्याची वाहने रस्त्यावर उभी न करता या पार्किंगमध्ये उभी करण्यात येतील. त्यामुळे या परिसरातील वाहतूककोंडीची समस्या सुटण्यासाठी मदत झाली आहेस्टेशनमधील सुधारणापावसाळ्यात पाण्याची गळती थांबण्यासाठी केली उपाययोजना.स्वच्छतागृहाची रंगरंगोटीजप्त वाहने हलविल्याने प्रशस्त र्पाकिंग उपलब्ध झाले आहे.तक्रारदार आणि नागरिकांसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था१५ आॅगस्ट रोजी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय कार्यान्वित झाले. पण गेल्या दहा वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या पोलीस ठाण्याला हक्काची जागा मिळत नाही. हा सांगवी पोलीस ठाण्यातील प्रश्न प्रलंबित आहे. याबाबत निर्णय होणे गरजेचे आहे.सांगवी पोलीस ठाण्यामध्ये अनेक मूलभूत सुविधा व समस्या होत्या. टप्प्याटप्प्याने त्या लवकरच दूर करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यातील काही सुधारणा प्रत्यक्षात दिसून येत आहेत. नागरिक व प्रशासनाने यासाठी मदत करावी, अशी अपेक्षा आहे.- मोहन शिंदे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सांगवी

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPolice Stationपोलीस ठाणे