शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कार्ला येथील एकवीरा देवस्थानला कळस भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2018 03:10 IST

येथील प्रसिद्ध एकवीरा देवी मंदिराचा कळस सहा महिन्यांपूर्वी चोरीला गेला आहे. सदर कळस चोरीस गेल्यानंतर नव्याने कळस बसविण्याबाबत खासदार श्रीरंग बारणे यांनी देवस्थान ट्रस्टला पत्र पाठवून विनंती केली होती़ मंदिर समितीने ती मान्य केल्यानंतर बारणे यांनी ट्रस्टसोबत संयुक्त पत्रकार परिषद घेत त्याबाबत घोषणा केली होती़ त्यानुसार मंगळवारी प्रताप श्रीरंग बारणे यांच्या हस्ते कळस देवस्थानला भेट देण्यात आला.

लोणावळा  - येथील प्रसिद्ध एकवीरा देवी मंदिराचा कळस सहा महिन्यांपूर्वी चोरीला गेला आहे. सदर कळस चोरीस गेल्यानंतर नव्याने कळस बसविण्याबाबत खासदार श्रीरंग बारणे यांनी देवस्थान ट्रस्टला पत्र पाठवून विनंती केली होती़ मंदिर समितीने ती मान्य केल्यानंतर बारणे यांनी ट्रस्टसोबत संयुक्त पत्रकार परिषद घेत त्याबाबत घोषणा केली होती़ त्यानुसार मंगळवारी प्रताप श्रीरंग बारणे यांच्या हस्ते कळस देवस्थानला भेट देण्यात आला.चिंचवड येथील सोनिगरा ज्वेलर्सचे मालक दिलीप सोनिगरा यांच्याकडून नव्याने हा कळस तयार करून घेण्यात आला आहे. प्रताप बारणे यांच्यासोबत या वेळी शिवसेना तालुकाप्रमुख राजू खांडभोर, उपतालुकाप्रमुख सुरेश गायकवाड, ओबीसी संघटना मावळ अध्यक्ष अंकुश देशमुख, माऊली घोगरे, नगरसेवक शिवदास पिल्ले, अशोक म्हाळसकर, विनायक हुलावळे, दत्तात्रय केदारी, प्रशांत शेडगे हे उपस्थित होते. श्री एकवीरा देवस्थान ट्रस्टकडे कळस सुपूर्द करत असल्याची कल्पना आपण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष अनंत तरे यांना दिल्याची माहिती खासदार श्रीरंग बारणे यांनी दिली.कळसचोरीनंतर देवस्थान ट्रस्टमध्ये झालेले वाद व काही विश्वस्तांनी ग्रामस्थांना हाताशी धरत तयार केलेला समांतर ट्रस्ट या वादामुळेआजपर्यंत मंदिरावर सदर कळस बसविण्यात आला नव्हता. दोन दिवसांपूर्वी धर्मादाय आयुक्तांकडून देवस्थान ट्रस्टच्या बाजूने निकाल लागल्यानंतर, खासदार श्रीरंग बारणे यांनी पुन्हा मंदिर समितीकडे कळस बसविण्याबाबत विनंती केली़ त्यानुसार बारणे यांचे चिरंजीव प्रताप बारणे यांनी एकवीरा देवी गडावर जाऊन कळस ट्रस्टकडे सुपूर्द केला. लोकसभेचे अधिवेशन असल्याने खासदार श्रीरंग बारणे दिल्लीमध्ये असल्याने ते उपस्थित राहू शकले नाहीत.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPuneपुणे