शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

वर्षातच ‘फेस्टिव्हल’वर ‘विघ्न’; महापालिकेचा उत्सव यंदा नाहीच

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2018 01:05 IST

संस्कृती व सांस्कृतिक रक्षक भाजपाला पडला विसर

पिंपरी : महापालिकेत भाजपाची सत्ता आल्यानंतर पिंपरी-चिंचवड गणेश फेस्टिव्हलचे गतवर्षी पुनरुज्जीवन केले. सोळा वर्षांनंतर पिंपरी-चिंचवड फेस्टिव्हल या नावाने नव्याने उत्सव सुरू झाला. मात्र, संस्कृती आणि सांस्कृतिक रक्षणाचे गोडवे गाणाऱ्या महापालिकेत वर्षभरातच फेस्टिव्हल गुंडाळला आहे. यंदाचे उत्सवाचे कोणतेही नियोजन केले नसल्याने सर्वच स्तरांतून टीका होत आहे.पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने महापौर आर. एस. कुमार यांच्या कालखंडात १९९६ मध्ये पिंपरी-चिंचवड गणेश फेस्टिव्हल सुरू केला होता. या अंतर्गत लोकसंगीतापासून शास्त्रीय संगीतापर्यंत असे विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात येत होते. हा महोत्सव निगडी प्राधिकरण, चिंचवड, पिंपरी, भोसरी अशा विविध ठिकाणी होत असे. स्वरभास्कर भारतरत्न भीमसेन जोशी, उदित नारायण, सोनू निगम, साधना सरगम अशा विविध मान्यवर कलावंतांचा कलाविष्कार शहरवासीयांना अनुभवयास मिळाला. तसेच सुरेखा पुणेकर यांच्या लावणीनेही बहार आणली होता. पुढे प्रकाश रेवाळे महापौर असताना गणेश फेस्टिव्हल बंद केला.त्यानंतर एक वर्ष पिंपरी-चिंचवड उत्सव, सांस्कृतिक संस्था आणि पालिकेच्या सहकार्याने एक वर्ष महोत्सव झाला. त्यानंतर पिंपरी-चिंचवड सोशल क्लबच्या वतीने २०१३ पर्यंत महोत्सव होत होता.या महोत्सवाचे गेल्या वर्षी पुनरुज्जीवन महापौर नितीनकाळजे यांनी केले होते. महापालिकेच्या वतीने एक ते तीन सप्टेंबरला पिंपरी-गणेश फेस्टिव्हल झाला होता. या फेस्टिव्हलमधून महाराष्ट्रीय लोककला आणि शास्त्रीय, उपशास्त्रीय आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी मिळाली होती.नव्या महापौरांना नाही माहितीनितीन काळजे यांनी राजीनामा दिला. त्यानंतर हा उत्सव वर्षभरातच बंद पडला आहे. गेल्या वर्षी हा महोत्सव आयोजित करणारे पदाधिकारी या वर्षी नसल्याने कोणालाही महोत्सवाची आठवण झालेली नाही. संस्कृती आणि सांस्कृतिक रक्षणाचे गोडवे गाणाºया भाजपाच्या नेत्यांना आणि महापालिकेतील पदाधिकाºयांना विसर पडला आहे. विद्यमान महापौर राहुल जाधव यांनाही महोत्सवाबाबत काहीही माहिती नसल्याचे दिसून आले.पिंपरी-चिंचवड फेस्टिव्हल या शहराची सांस्कृतिक ओळख करणारा उत्सव होता. त्यातून गणेशभक्तांचे मनोरंजन व्हावे, हाच उद्देश होता. त्यासाठी गेल्या वर्षी महोत्सवाची खंडित परंपरा सुरू केली. गेल्या वर्षी तीन दिवसीय फेस्टिव्हल झाला. ही परंपरा कायम ठेवावी,अशी सूचना केली होती. पद सोडल्यानंतर एकाच वर्षात महोत्सव बंद करणे ही चांगली गोष्ट नाही.- नितीन काळजे, माजी महापौर

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMuncipal Corporationनगर पालिकाBJPभाजपा