शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

... शेवटी काय तर तुम्ही आहे म्हणून गाव आहे, तेवढं फक्त मतदानाला गावाकडे या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2020 14:53 IST

आमचा तुम्हाला गावाकडे यायला विरोध नव्हता. पण काही शहाणी लोक आहेत, तेच विरोध करत होते...

ठळक मुद्देइच्छुकांकडून ग्रामपंचायती निवडणुकीसाठी शहरवासीयांसाठी मनधरणी

तेजस टवलारकर -

पिंपरी : मताला गावाकडे या, असे फोन गावाकडून येण्यास सुरुवात झाली आहे. आता आम्ही गावाकडे आलो तर चालेल का, असा प्रश्न शहरवासीयांनी विचारला तर अहो, आमचा तुम्हाला गावाकडे यायला विरोध नव्हता. पण काही शहाणी लोक आहेत, तेच विरोध करीत होते. शेवटी तुम्ही आहे म्हणून गाव आहे, अशी मनधरणी इच्छुकांकडून ग्रामपंचायती निवडणुकीत होत आहे.मार्च महिन्यात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला. तेव्हा कोरोनाच्या भीतीने गावांमध्ये बाहेरील व्यक्तींना गावबंदी करण्यात आली होती. आता ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाल्यामुळे गावातील नेत्यांना शहरी मतदारांची आठवण झाली आहे.

मावळातील ५७ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. १५ जानेवारीला मतदान होणार असून, १८ जानेवारीला मतमोजणी होणार आहे. इच्छुक उमेदवारांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. रोजगारासाठी गावातील अनेक नागरिक पुणे, पिंपरी-चिंचवड, मुंबई, या शहरांत गेले आहेत. अशा मतदारांना फोन करून, मेसेज करून निवडणुकीत मतदान करण्याचे आवाहन इच्छुक उमेदवार करीत आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीत मतदार हे तुलनेने कमी असतात. निवडणुकीत सर्वच स्थानिक उमेदवार उभे असतात. ग्रामपंचायत निवडणूक ही नेहमीच अटीतटीचे होती. यामुळे प्रत्येक मतदाराला विशेष महत्त्व असते.

ग्रामपंचायत निवडणुकीत उमेदवार पॅनलच्या माध्यमातून निवडणुका लढवित असतात.इच्छुक उमेदवारांकडून पॅनल उभे करण्याची तयारी सुरू आहे. कोरोनामुळे ग्रामपंचायत निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता. ग्रामपंचायतींची मुदत संपल्याने प्रशासक नेमण्याची वेळ आली होती. यावरून ग्रामीण भागातील राजकारण तापले होते. कोरोना रुग्णांचे प्रमाण कमी होत आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने ग्रामपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे.

--सुरुवातीला होती गावबंदी

अनेक गावांमध्ये कोरोनाच्या भीतीने बाहेरील व्यक्तींना गावबंदी करण्यात आली होती. ग्रामस्थांनी गावाच्या वेशीवर कुंपण करून, बांबूचे अडथळे तयार करून किंवा दगड ठेवून गावचा रस्ता अडवून धरला होता. काही गावांच्या वेशीवर गावातील लोक आळीपाळीने पहारा देत होते. गावात बाहेरील व्यक्तीला येऊ दिले जात नव्हते. त्यामुळे कायदा सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. पण तेच कार्यकर्ते शहरी मतदारांना गावाकडे या, असा आग्रह करीत आहेत.---

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडVotingमतदानElectionनिवडणूकgram panchayatग्राम पंचायत