शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
2
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
3
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
6
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
7
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
8
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
9
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
10
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
11
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
12
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
13
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
14
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
15
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
16
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
17
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
18
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
19
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
20
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!

पवनानगर परिसरात सतर्कतेचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2018 01:42 IST

पवना धरणातून सोमवारी दुपारी तीन वाजल्यापासून ४४५० क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. शिवली येथील पूल पाण्याखाली गेला आहे.

पवनानगर : पवना धरणातून सोमवारी दुपारी तीन वाजल्यापासून ४४५० क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. शिवली येथील पूल पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे परिसरातील शिवली, भडवली, काटेवाडी, येवलेवाडी, येलघोल, धनगव्हाण या गावांचा या पुलावरून होणारा संपर्क तुटला आहे.पवना धरण १०० टक्के भरले आहे. शुक्रवारी (दि. १०) धरणाच्या सांडव्यावरून ८०० क्युसेकने विसर्ग करण्यात आला होता. त्यानंतर शनिवारी धरण परिसरात पावसाचा जोर वाढल्यामुळे सकाळी १५०० क्युसेकने आणि सायंकाळी २२०८ क्युसेकने पाणी सोडण्यात आलेआहे. रात्रभर पावसाचे प्रमाण वाढल्याने रविवारी सकाळी नऊच्या सुमारास ३३८५क्यसेकने पाण्याचा विसर्ग करण्यात आला. परंतु, पवनमावळ परिसरात पावसाचाजोर वाढल्याने धरणाच्या सहा दरवाजातून ४५७० क्युसेकने पाण्याचा विसर्ग पवना नदीपात्रात सोडण्यात आला आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे, अशी माहिती पाटबंधारे विभागाचे ए. एम. गदवाल यांनी दिली.वडिवळे हाऊसफुल्लकामशेत : मावळासह कामशेत शहरात पावसाची संततधार सुरू असून मागील काही दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. जोरदार पडणाऱ्या या पावसामुळे मावळ परिसरातील शेतकरी सुखावला आहे, तर नाणे मावळातील वडिवळे धरण सोमवारी १०० टक्के भरले आहे. धरणाचे दोन दरवाजे १० सेंमीने उघडले असून, ५५० क्युसेकने पाणी विसर्ग सुरू आहे. आठवडाभरापासून पावसाने पुन्हा चांगला जोर धरला आहे. नाणे मावळ परिसरात सर्वत्र संततधार आहे. गेले दीड ते दोन महिने पडणाºया पावसामुळे वडिवळे धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होऊन सोमवारी सकाळी धरण १०० टक्के भरले. सकाळी १० वाजल्यापासून धरणाचे दोन दरवाजे १० सेंमीने सुरू केले आणि ५५० क्युसेकने पाणी विसर्ग सुरु करण्यात आला. नदी किनारी गावांना सतर्कतेचा इशारा दिला असल्याची माहिती वडिवळे धरण शाखा अभियंता मनोहर खाडे यांनी दिली.

टॅग्स :Rainपाऊसpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड