शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

Vidhan Sabha 2019 : चिंचवड मतदारसंघातून तृतीयपंथी उमेदवार रिंगणात

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2019 16:57 IST

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 : चिंचवड मतदारसंघात सुमारे सातशे तृतीयपंथी आहेत. मात्र, यातील काही मोजक्याच जणांची नावे मतदार यादीत आहेत.

ठळक मुद्देतृतीयपंथीयांचे नाव मतदार यादीत नोंदविण्यात येतात अडचणी

पिंपरी : तृतीय पंथीयांचे प्रश्न सोडविण्यासाठी चिंचवड विधानसभा मतदारसंघातून जनहित लोकशाही पार्टीतर्फे तृतीयपंथी उमेदवारास निवडणूक रिंगणात उतरविण्यात येत आहे. त्यामुळे या मतदारसंघातील निवडणुकीकडे सर्वांचे लागून आहे.जनहित लोकशाही पार्टीतर्फे पिंपरी येथे पत्रकार परिषदेत याबाबत माहिती देण्यात आली. पार्टीचे अध्यक्ष अशोकराव आल्हाट, उपाध्यक्ष संतोष चौधरी, प्रदेशाध्यक्ष डॉ. विनोद मोरे, उपाध्यक्ष मिलिंद साळवी, जनहित कर्मचारी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष विश्वास गजरमल, बाळासाहेब पाटोळे, जनहित तृतीय पंथी लोकशाही आघाडीचे प्रदेशाध्यक्ष नितीश लोखंडे, पुणे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब मुखे आदी या वेळी उपस्थित होते. नताशा लोखंडे असे या तृतीय पंथी उमेदवाराचे नाव आहे. स्थानिक रहिवासी असलेल्या नताशा पदवीधर असून हॉटेल मॅनेजमेंट झालेले आहे.

आपल्या उमेदवारीबाबत त्या म्हणाल्या, चिंचवड मतदारसंघात सुमारे सातशे तृतीय पंथी आहेत. मात्र यातील काही मोजक्याच जणांची नावे मतदार यादीत आहेत. ओळखपत्र, आधार कार्ड, रेशनिंग कार्ड आदी विविध कागदपत्रे उपलब्ध होत नसल्याने तृतीयपंथीयांचे नाव मतदार यादीत नोंदविण्यात अडचणी येतात. तसेच त्यांच्या रोजगाराचा प्रश्न आहे. या समस्या सोडविण्यासाठी मी निवडणूक रिंगणात आहे. तृतीयपंथीयांची स्वतंत्र ओळख निर्माण झाली पाहिजे. मात्र यंत्रणा आणि समाज त्याबाबत उदासीन आहे. ही परिस्थिती बदलायची आहे. माज्या शिक्षणाचा फायदा मी या घटकासाठी करून देण्याचा प्रयत्न करणार आहे. चिंचवड मतदारसंघात आयटीयन्स मोठ्या संख्येने आहेत. आयटी क्षेत्राशी माझा संपर्क असल्याने या मतदारांचा मला फायदा होणार आहे. त्यांच्या समस्या मला माहित आहेत. तसेच सामान्यांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019ElectionनिवडणूकTransgenderट्रान्सजेंडरPoliticsराजकारणpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडAssembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019