शहरं
Join us  
Trending Stories
1
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
2
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
3
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
4
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
5
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
6
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
7
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!
8
सोमनाथसोबत खरंच लग्न केलं? अखेर राजेश्वरी खरातचा मोठा खुलासा, म्हणाली- "लवकरच मी गुड न्यूज.."
9
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
10
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
11
दोन्ही पत्नी अन् आता गर्लफ्रेंडही हिंदू, मग मुलांची नावं मुस्लिमच का? आमिर खान म्हणाला...
12
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
13
'फादर्स डे': विराट कोहलीसाठी लेक वामिकाने बनवलं खास ग्रिटींग कार्ड, लिहिलाय खास संदेश
14
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!
15
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
16
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्ताननं घेतली भूमिका; मुस्लीम देशांना एकजूट होण्याचं आवाहन
17
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
18
बेडरूममधल्या 'या' ३ गोष्टी लगेचच फेका; श्वास घेण्यास त्रास आणि रात्रीची झोपही होईल खराब
19
Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये आता ज्येष्ठ नागरिकांचा डबा
20
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!

पिंपरी-चिंचवड शहर कुस्तीगीर संघाचे उपाध्यक्ष व वस्ताद पोपटराव फुगे यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2020 19:20 IST

भोसरी पंचक्रोशीत 'वस्ताद'  म्हणून ते परिचित होत..

भोसरी : पिंपरी-चिंचवड शहर कुस्तीगीर संघाचे उपाध्यक्ष व  वस्ताद पोपटराव सदाशिवराव फुगे (वय ६५) यांचे हृदयविकाराने सोमवारी निधन झाले. नगरसेविका भीमाबाई फुगे यांचे ते पती होत. फुगे यांच्या निधनाने कुस्ती क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.

भोसरी पंचक्रोशीत 'वस्ताद' म्हणून ते परिचित होत. काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. मात्र, त्यांनी कोरोनावर मात केली होती. त्यांच्या आरोग्यात सुधारणा देखील झाली होती. परंतु, तत्पूर्वीच सोमवारी (ता. २८) सकाळी त्यांचे रुग्णालयातच हृदयविकाराने निधन झाले.

तरुणांनी कुस्तीकडे 'प्रोफेशन' म्हणून पाहावे यासाठी ते प्रयत्नशील होते. यासाठी तरुणांना कुस्तीचे प्रशिक्षण देण्याचे काम फुगे करत होते.  भोसरी गावजत्रा मैदानात प्रमुख पंच म्हणूनही ते जबाबदारी पार पाडत होते. महेशदादा स्पोर्ट्स फाउंडेशन व व्यायाम मंडळाचे ते वस्ताद होते. ते फुगे-माने तालीम मंडळाचे अध्यक्षही होते. भोसरी दरवर्षी होणाऱ्या वैष्णव विचार कीर्तन महोत्सव भरविण्यामध्येही त्यांचे सहकार्य असायचे. त्यांना क्रीडा क्षेत्राची आवड असल्याने खेळाडूंसाठी स्पर्धेचे आयोजन करायचे. त्यांनी दहा वर्षापूर्वी कै. सदाशिवराव फुगे यांच्या स्मरणार्थ राज्यस्तरीय कुस्ती आणि कबड्डी स्पर्धा भरविली होती.

टॅग्स :bhosariभोसरीDeathमृत्यू