शहरं
Join us  
Trending Stories
1
मान्सूनची घाई, वेळेआधीच केरळ गाठले; राज्यात २ दिवसांत; २००९ नंतर प्रथमच आठवडाभर आधी आगमन
2
आजचे राशीभविष्य २५ मे २०२५ : धन- संपत्ति, मान - सन्मानाची प्राप्ती
3
केंद्र अन् राज्यांनी ‘टीम इंडिया’प्रमाणे काम केल्यास काहीही अशक्य नाही; PM मोदी यांचे आवाहन
4
काळजी नको, सगळे सुरळीत होईल; राहुल गांधींचा दिलासा, सीमाभागातील मृतांच्या कुटुंबांचे सांत्वन
5
५ वर्षांत एक ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचे लक्ष्य; 'महाराष्ट्राचेही व्हिजन २०४७': CM फडणवीस
6
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आग्रही; पण विधिमंडळाच्या नीतिमूल्य समितीची अद्याप प्रतीक्षाच
7
मुंबई, पुणे, नागपूरसह ७ जिल्ह्यांतून ५४ टक्के उत्पन्न; विकासाच्या प्रादेशिक असंतुलनावर बोट
8
हगवणेंकडून पिस्तुले, चांदीची भांडी, कार जप्त; CM फडणवीस, DCM शिंदेंकडून कुटुंबाचे सांत्वन
9
संततधारेने पिकांना मोठा फटका; बळीराजा संकटात, अनेक जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता
10
ॲपलला भारतात जायचे असेल तर जावे, पण अमेरिकेत फोनवर कर लागणारच; ट्रम्प यांचा धमकीवजा इशारा
11
कीव्ह शहरावर रशियाचे ड्रोन, क्षेपणास्त्र हल्ले; १५ जखमी, ओबोलोन जिल्ह्याचे सर्वाधिक नुकसान
12
रुग्णासाठी चॅटजीपीटी बनले वकील, बिनतोड युक्तिवादाने मिळवून दिला २ लाखांचा रिफंड
13
पनवेल-सोमटणे, पनवेल-चिखली नवीन कॉर्ड लाइन; राहुरी-शनी शिंगणापूर नव्या रेल्वे मार्गास मान्यता
14
‘फिरत्या पम्पिंग स्टेशन’मुळे पाण्याचा लवकर निचरा; ४ वर्षांसाठी भाडेतत्त्वावर, ८ कोटी खर्च
15
‘विरार-अलिबाग’ विलंबाचा दिल्ली एक्स्प्रेसवेला फटका; ठाण्यात होणार अवजड वाहनांमुळे कोंडी
16
PBKS vs DC : दिल्लीकर समीरची मॅच विनिंग फिफ्टी; पंजाबचं टेन्शन वाढलं! Qualifier 1 च्या शर्यतीत नवं ट्विस्ट
17
Vaishnavi Hagawane: वैष्णवीच्या बाळाला एकनाथ शिंदेंनी घेतलं जवळ, आईवडिलांना दिला धीर; काय घडलं?
18
IPL 2025 Qualifier 1 Race : आता MI चे कट्टर चाहतेही करतील CSK ला चीअर; कारण...
19
हे वागणं बरं नव्हं... खासदारांनी नाराजीचा सूर आळवत रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना धरले धारेवर 
20
'दोषींना पाठिशी घालणाऱ्यांवरही कारवाई करणार', एकनाथ शिंदेंनी घेतली वैष्णवी हगवणेच्या आईवडिलांची घेतली भेट

'महिला आयोगाच्या सध्याच्या अध्यक्षांना शक्य नसेल तर…' उपसभापती गोऱ्हे यांचे भाष्य

By नारायण बडगुजर | Updated: May 24, 2025 19:16 IST

या प्रकरणाची दखल मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी घेतली असून, मयुरी व वैष्णवीला नक्की न्याय मिळेल, असेही त्यांनी सांगितले.

पिंपरी :वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाच्या तपासात कोणतीही त्रुटी राहू नये. संशयितांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या मदत करणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे, असे विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी म्हटले आहे.विधान परिषदेच्या उपसभापती गोऱ्हे यांनी वैष्णवी हगवणे हिच्या आई-वडिलांची भेट घेतली. त्यानंतर त्या माध्यमांशी बोलत होत्या. यावेळी शिवसेना संपर्कप्रमुख सारिका पवार, कांता पांढरे, सुदर्शन त्रिगुणाईत, जिल्हाप्रमुख मनीषा परांडे, स्त्री आधार केंद्र पुणेच्या अनिता शिंदे आदी उपस्थित होते. पोलिसांकडून या प्रकरणात चार्जशीट दाखल झालेली असून, साक्षी-पुराव्यात कोणताही हस्तक्षेप शक्य नसल्याचे सांगण्यात आले. हुंडाबळीची शिकार झालेल्या मुलींना न्याय मिळावा यासाठी पोलिसांनी काही केले नाही, हे म्हणण्यापेक्षा पीडित महिलांची कायदा साक्षरता वाढवणे गरजेचे आहे. समाज म्हणून आपण सर्वजण निष्पक्षपणे त्यांच्या पाठीशी उभे राहणे आवश्यक आहे.

वैष्णवी हगवणेची जाऊ मयुरी जगताप हिची भेट घेऊन तिलादेखील न्याय मिळवून देण्याचे आश्वासन डॉ. गोऱ्हे यांनी दिले. तसेच या प्रकरणाची दखल मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी घेतली असून, मयुरी व वैष्णवीला नक्की न्याय मिळेल, असेही त्यांनी सांगितले.

महिला आयोगाच्या अध्यक्षांना शक्य नसेल तर...

उपसभापती गोऱ्हे यांनी आयोगाच्या कार्यपद्धतीवरही भाष्य केले. महिला आयोगाने मयुरी जगताप प्रकरणामध्ये पोलिसांना कौटुंबिक हिंसाचारापासून संरक्षण कायद्यानुसार चालविण्याचा सल्ला दिला असता, तर आतापर्यंत तिला प्रॉपर्टीत वाटा मिळाला असता. मात्र, राज्य महिला आयोगाचे काय चूक आणि बरोबर हे ‘ट्रायल बाय मीडिया’ होऊ नये. मात्र, ते जे काही काम करत आहेत. त्यात अजून काही तज्ज्ञ व सामाजिक संस्थांना सोबत घेऊन बैठका घ्याव्यात. विजया रहाटकर यांनी ते केले होते. महिला आयोगाच्या सध्याच्या अध्यक्षांना शक्य नसेल तर दुसऱ्या कुणीतरी नियमित बैठका घेणे आवश्यक आहे. तसेच अद्यापही महिला आयोगावरील सदस्यांची पदे रिक्त असल्याचेही त्यांनी लक्षात आणून दिले.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रVaishnavi Hagawane Death Caseवैष्णवी हगवणे