शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

उद्योगनगरीत असुरक्षित माहिती अधिकार कार्यकर्ते, माहितीचा गैरवापर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2018 00:45 IST

माहितीचा गैरवापर : अधिकाऱ्यांऐवजी ठेकेदारच घेताहेत पुढाकार

पिंपरी : माहिती अधिकार कायद्यांतर्गत माहिती मागविणाºया कार्यकर्त्याला माहिती देण्यास अधिकारी बांधील असतात़ मात्र अधिकाºयांऐवजी अर्जदाराशी संपर्क साधण्यास ठेकेदारच पुढाकार घेत आहेत. या प्रकारामुळे अधिकारी आणि संबंधित ठेकेदार यांचे संगनमत असल्याचे निदर्शनास आले आहे. विद्युत महावितरणच्या अधिकाºयांकडून घडलेल्या

प्रकाराची तक्रार राहुल कोल्हटकर यांनी दिली आहे. याप्रकरणी कोल्हटकर यांनी पोलिसांकडेसुद्धा तक्रार नोंदवली आहे.माहिती अधिकार कायद्यांतर्गत कोल्हटकर यांनी मोशी, प्राधिकरण येथील व्यावसायिक इमारतीला दिलेल्या वीज जोडाबाबत माहिती मागवली. रीतसर लेखी अर्ज देऊन अधिकाºयांकडे माहिती मागितली. वीज जोडसाठी अर्ज प्राप्त झाल्यापासून ते वीजजोडणी पूर्ण होईपर्यंतचा कार्यअहवाल मिळावा, अशी मागणी रास्ता पेठ पुणे येथील विद्युत महावितरणच्या मुख्य कार्यालयाकडे करण्यात आली. चार महिने उलटले, तरी माहिती दिली गेली नाही. अखेर १२ सप्टेंबरला विलंबाने माहिती देण्यात आली. विचारलेल्या प्रश्नांची विसंगत उत्तरांसह माहिती देण्यात आली. त्यामुळे पुन्हा ही माहिती मिळण्यासाठी नव्याने अर्ज दाखल केला. आकुर्डी विद्युत महावितरण कार्यालयातून २४ आॅक्टोबरला मोबाइलवरून संपर्क साधून माहिती घेऊन जाण्यास सांगण्यात आले. अनोळखी व्यक्तीने संपर्क साधून माहिती घेऊन जाण्यास सांगितले. चलन भरणा विभाग बंद असल्याने चलन भरले नाही, असे कोल्हटकर यांनी अनोळखी व्यक्तीस सांगितले. रात्री उशिरा साडेनऊच्या सुमारास अर्जदारास आणखी एका अनोळखी व्यक्तीने मोबाइलवर संपर्क साधून आपणास हवी असलेली माहिती मिळाली का, अशी विचारणा केली. कार्यालयीन वेळ संपल्यानंतर अनोळखी व्यक्ती संपर्क साधत असल्याने कोल्हटकर यांना धक्का बसला.माझा मोबाइल क्रमांक आपणास कोणी दिला? असा प्रश्न संबंधितास विचारले असता, विद्युत वितरण कार्यालयातील अधिकाºयांनी क्रमांक दिला असल्याचे अनोळखी व्यक्तीने सांगितले.कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता : अदखलपात्र गुन्हा४माहिती अधिकारात मागवली जाणारी माहिती संबंधित अर्जदाराशिवाय अन्य कोणाला देणे अपेक्षित नसते. अधिकाºयांना रीतसर अर्ज दिल्यानंतरही तिºहाईत व्यक्तीला माहिती दिली जाते. तिºहाईत व्यक्ती माहिती अधिकारात माहिती मागविणाºया अर्जदाराशी थेट संवाद साधते. अधिकाºयांऐवजी ठेकेदार माहिती अधिकारात माहिती मागविणाºयांशी संपर्क साधतात. माहिती अधिकारांतर्गतची गोपनीय मााहिती त्यांच्यापर्यंत पोहोचते. ही बाब माहिती अधिकार कार्यकर्त्यांच्या दृष्टीने धोकादायक आहे, असे कोल्हटकर यांनी तक्रारीत म्हटले आहे. यासंदर्भात त्यांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.

 

टॅग्स :RTI Activistमाहिती अधिकार कार्यकर्ताpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड