शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पदपथावरील बेशिस्त पार्किंग, अतिक्रमणामुळे पादचाऱ्यांचे हाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2019 19:36 IST

सुरक्षेचा प्रश्न..

ठळक मुद्देभर रस्त्यातून करावी लागते ये-जा, नागरिकांना सहन करावा लागतोय त्रासपादचाऱ्यांना चालण्यासाठी हक्काचा असणारा पादचारी मार्ग बंद

पराग कुंकूलोळ - चिंचवड : चिंचवड स्टेशन परिसरात पादचारी मार्गावर पथारीवाले व हातगाडी व्यावसायिकांनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे पादचाऱ्यांना पदपथाऐवजी भर रस्त्यातून ये-जा करावी लागते. परिणामी त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. मुख्य रस्त्यावर अनधिकृत प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांमुळे या भागात परिस्थिती गंभीर झाली आहे. या भागात नेहमीच मोठी वर्दळ असते. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होऊन वाहनचालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. यावर उपाययोजना करून त्वरित समस्या सोडविण्यात यावी, अशी मागणी वाहनचालक तसेच नागरिकांकडून करण्यात येत आहे.पादचाऱ्यांना चालण्यासाठी हक्काचा असणारा पादचारी मार्ग बंद झाला असल्याने नागरिकांना मुख्य रस्त्यावरून जीव धोक्यात घालून चालावे लागते. याच परिसरातील महावीर चौकातही परिस्थिती गंभीर आहे. आनंदनगरकडे जाण्यासाठी वाहनचालक विरुद्ध दिशेने जातात. यामुळे येथे वाहतुकीचा खोळंबा ही नित्याचीच समस्या झाली आहे. वाहतूक पोलिसांसमोर हा सर्व प्रकार होत असूनही वाहतूक शाखेचे कर्मचारी या समस्येकडे दुर्लक्ष करीत आहेत.ग्रेड सेप्रेटरमध्ये प्रवासी वाहने थांबविली जातात. येथून अनेक प्रवासी जीवधोक्यात घालून रस्ता ओलांडतानाचे वास्तव दिसत आहे. या मार्गावर वाहने थांबविण्यास बंदी असूनही हा प्रकार सर्रासपणे सुरू आहे. यामुळे या भागात अनेकदा अपघाताच्या घटना घडत आहेत. येथे वाहतुकीचे योग्य नियोजन व्हावे, अशी नागरिकांची मागणी आहे. सायंकाळी येथील महावीर चौकात वाहतूककोंडी होते. लांबलचक वाहनांच्या रांगा लागलेल्या असतात. विरुद्ध दिशेने होणारी वाहतूक वाहतुकीस अडथळा ठरत आहे.................बेशिस्त पार्किंगमुळे वाहतुकीचा खोळंबाचिंचवड स्टेशन येथून अवैध प्रवासी वाहतूक करण्यात येते. अशा वाहनचालकांकडून भर रस्त्यात बेशिस्त पार्किंग केली जाते. पुणे-मुंबई महार्गावर भर चौकात पीएमपीएमएलचा बसथांबा असून, त्याच्यासमोरच अवैध प्रवासी वाहतूक करणारी वाहने उभी असतात. तसेच काही रिक्षाचालकही त्यांच्या रिक्षा येथे बेशिस्तपणे पार्किंग करतात. त्यामुळे येथे 

अवजड वाहनांमुळे कोंडीत भर चिंचवड स्टेशन येथून आकुर्डीकडे जाणारी वाहने सिग्नलवरून मोठ्या संख्येने जात असल्याने या चौकात वाहतुकीचा वेग मंदावतो. त्यात अवजड वाहनांची भर पडते. अवजड वाहनांमुळे येथे वाहतूककोंडी होते. तसेच या अवजड वाहनांमुळे अपघात होऊन पादचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित होत आहे. ........आनंदनगर भागाकडे विरुद्ध दिशेने जाणाऱ्या वाहनचालकांवर नियमित कारवाई होत नसल्याने अशा बेशिस्त वाहनचालकांना धाक नसल्याचे वास्तव समोर दिसत आहे. वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी या भागात नियमित दंडात्मक कारवाई करावी, अशी नागरिकांची मागणी आहे. दिवसेंदिवस या भागात होणारी वाहतूककोंडी टाळण्यासाठी वाहतूक शाखेने नियोजन करणे महत्त्वाचे असल्याचे मत नागरिक व्यक्त करीत आहेत..........४चिंचवड स्टेशन येथे पदपथांवर काही विक्रेत्यांनी अतिक्रमण केले आहे. टेबल ठेवून विविध वस्तूंची विक्री केली जाते. त्यामुळे या पदपथांचा पादचाऱ्यांना वापर करता येणार नाही. या विक्रेत्यांच्या दुचाकी तसेच इतर वाहनेही पदपथांवर पार्किंग करण्यात आल्याचे दिसून येते. अशा विक्रेत्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडParkingपार्किंगEnchroachmentअतिक्रमण