शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरी महापालिका भवन, वल्लभनगरातील दोन जागा महामेट्रोला ३० वर्षे भाडेतत्वावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2020 12:32 IST

दापोडीच्या हॅरिस पूल ते चिंचवडच्या मदर टेरेसा उड्डाणपूल या साडेसात किलोमीटर अंतराच्या पुणे मेट्रो मार्गिकेचे काम अंतिम टप्प्यात आहे.

ठळक मुद्देएकूण २ कोटी ९९ लाख ९६ हजार ७६३ रुपये भाडे अपेक्षित

पिंपरी : पुणे मेट्रोच्या कामासाठी महापालिका भवन येथील १९४ चौरस फूट आणि वल्लभनगर (पिंपरी) येथील २३ हजार ४२५ चौरस फूट क्षेत्रफळाची जागा महामेट्रोला ३० वर्षे भाडेतत्वावर दिली जाणार आहे. त्यासाठी एकूण २ कोटी ९९ लाख ९६ हजार ७६३ रुपये भाडे अपेक्षित आहे. 

दापोडीच्या हॅरिस पूल ते चिंचवडच्या मदर टेरेसा उड्डाणपूल या साडेसात किलोमीटर अंतराच्या पुणे मेट्रो मार्गिकेचे काम अंतिम टप्प्यात आहे. त्यासाठी विविध  ठिकाणच्या सुमारे सात जागा यापूर्वीच महापालिकेने मेट्रोच्या ताब्यात दिल्या आहेत. मेट्रोला विद्युत पुरवठा करण्यासाठी रोहित्र, आरएमयू संच बांधणीसाठी महामेट्रोच्या वतीने वल्लभनगर एसटी आगारासमोरील २३ हजार ४२५ चौरस फुटाची जागा मागितली आहे. तसेच, महापालिका भवनातील १९४ चौरस फुटाची जागा विद्युत डीपी बांधणीसाठी मेट्रोने ८ फेब्रुवारीच्या पत्राद्वारे मागितली आहे. 

वल्लभनगरची जागा महापालिकेने उमेद मान्यतेवर २६ ऑक्टोबर २०१० रोजी महामेट्रोच्या ताब्यात दिली आहे. महापालिका भवन आवारातील जागेचा भाडे दर १ हजार ८७७ रुपये चौरस फूट आहे. त्यानुसार ३० वर्षांसाठी तीन  लाख ६४ हजार १३८ रुपये भाडे होते. वल्लभनगरच्या जागेचे भाडे दर १ हजार २६५ रुपये चौरस फूट आहे.त्याचे ३० वर्षांचे एकूण भाडे दोन कोटी ९६ लाख ३२ हजार ६२५ होते. या एकूण २३ हजार ६१९ चौरस फूट जागेचे ३० वर्षांचे एकूण भाडे २ कोटी ९९ लाख ९६ हजार ७६३ होते. पुणे मेट्रो प्रकल्पात महापालिकेचा एकूण आर्थिक हिस्सा २८६ कोटी ७० लाख रुपयांचा आहे. त्यापैकी जागेचा हिस्सा १८२ कोटी ६० लाख आहे. त्यानुसार वरील दोन्ही जागा महापालिका आर्थिक हिस्सापोटी देणार आहे. त्यास मान्यता देऊन सर्वसाधारण सभेकडे शिफारस करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर सादर केला आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMetroमेट्रोshravan hardikarश्रावण हर्डिकर