शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

मनोरुग्णालयातून पळालेल्या दोघांना भोर येथून केले जेरबंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2018 23:40 IST

येरवडा कारागृहातील दोघा गुन्हेगारांना उपचारासाठी येरवडा येथील मनोरुग्णालयात ठेवले असताना तेथील कर्मचा-यांना मारहाण करुन पळून गेलेल्यांना खडकी पोलिसांनी भोर येथून अटक केली आहे.

पुणे - येरवडा कारागृहातील दोघा गुन्हेगारांना उपचारासाठी येरवडा येथील मनोरुग्णालयात ठेवले असताना तेथील कर्मचा-यांना मारहाण करुन पळून गेलेल्यांना खडकी पोलिसांनी भोर येथून अटक केली आहे. संतोष सुदाम बाबर आणि उदय गुहाराम बंजारे उर्फ उदया काटकर अशी त्यांची नावे आहेत. 

संतोष बाबर याला चतु:श्रृंगी पोलीस ठाण्याच्या हद्दी २०१६ मध्ये झालेल्या खुन प्रकरणात अटक करण्यात आली होती. सध्या तो येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत होता.  उदय बंजारे याला देहुरोड पोलीस ठाण्यातील अपहरणाच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा झालेली आहे़ या दोघांना उपचारासाठी येरवडा येथील मनोरुग्णालयात दाखल करण्यात आले होते़ ५ जुलै रोजी दुपारी तीन ते साडेतीन वाजण्याच्या दरम्यान दोघांनी चहा घेतला़ त्यानंतर उदय वंजारे याने लालसिंग वाघमारे यांना मला फोनवर बोलायचे आहे, असे म्हणाला़ फोनवर बोलायला परवानगी नाही असे त्यांनी सांगितल्यावर तो निघून गेला़. थोड्या वेळाने वाघमारे हे फोनवर बोलत असताना तो पाठीमागून आला व त्याने वाघमारे यांच्या डोक्यात लाकडी दांडक्याने मारहाण करुन जखमी केले़ त्यांच्या मदतीला आलेले सतीश रणपिसे यांच्या डोक्यावर व दोन्ही हातावर बांबुने मारुन जखमी केले़ ते खाली पडल्यावर त्यांच्या खिशातील मेनगेटच्या चाव्या घेऊन जात असताना फोनवर बोलत असलेल्या सिस्टर रुपाली विजय अधिकारी यांचा मोबाईल घेऊन आपटून फोडला़ त्यानंतर मेनगेटचे कुलूप काढून गेटला बाहेरुन कुलूप लावून दोघेही जण पळून गेले.  याप्रकरणी लालसिंग वाघमारे यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती़.

खडकी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक एऩ व्ही़ महाडिक यांना त्यांचे बातमीदारांमार्फत या आरोपींची माहिती मिळाली़ त्यानुसार पोलीस उपायुक्त दीपक साकोरे, सहायक पोलीस आयुक्त गणेश गावडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोहिते, करपे (गुन्हे) यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक महाडिक, अरक लक्ष्मण बांगर, बाबा शिर्के, पोलीस हवालदार गुरव, लोखंडे यांनी भोर येथे जाऊन दोघांना ताब्यात घेतले़ त्यांना येरवडा पोलिसांच्या हवाली केले आहे. 

टॅग्स :Arrestअटकnewsबातम्या