शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

पिस्तूल विक्रीस आलेल्या दोघांना पिंपरीत अटक; ४ लाख ४१ हजार रुपयांचा ऐवज जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2017 18:18 IST

बेकायदेशीररित्या देशी बनावटीचे पिस्तूल विक्रीसाठी मुंबई (ठाणे) येथून आलेल्या दोघांना पिंपरी पोलिसांनी शुक्रवारी मोरवाडी येथून अटक केली.

ठळक मुद्देपिंपरी पोलिसांनी सापळा रचून दोघांना घेतले ताब्यात एकूण ४ लाख ४१ हजार रुपयांचा ऐवज जप्त

पिंपरी : बेकायदेशीररित्या देशी बनावटीचे पिस्तूल विक्रीसाठी मुंबई (ठाणे) येथून आलेल्या दोघांना पिंपरी पोलिसांनी शुक्रवारी मोरवाडी येथून अटक केली. त्यांच्याकडून चारचाकी मोटार, पिस्तूल आणि जिवंत काडतुसे असा एकूण ४ लाख ४१ हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. जिवा अर्जुन आहेर (वय ४७, रा. डोंबवली, ठाणे) आणि उमाकांत शिवभूषण त्रिपाठी (वय ४६, रा. डोंबिवली, ठाणे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.पिंपरी, मोरवाडी येथे एका मोटारीतून दोघेजण पिस्तूल विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पिंपरी पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली. अंगझडती घेतली असता एकाकडे गावठी बनावटीचे पिस्तूल आणि दुसर्‍याकडे जिवंत काडतूसे आढळून आली.

टॅग्स :ArrestअटकCrimeगुन्हाpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड