शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

हितेश मुलचंदानी खून प्रकरणी दोन आरोपींना अटक; पिंपरी कॅम्पात कँडलमार्च

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2019 15:06 IST

हितेश गोवर्धन मुलचंदानी या तरुणाचा मंगळवारी (दि. २३) पिंपरीत खून झाला. हॉटेल समोर झालेल्या किरकोळ वादातून पाच जणांनी हितेश याचे अपहरण करून त्याचा निर्घृणपणे खून केला.

पिंपरी : हितेश गोवर्धन मुलचंदानी या तरुणाचा मंगळवारी (दि. २३) पिंपरीत खून झाला. हॉटेल समोर झालेल्या किरकोळ वादातून पाच जणांनी हितेश याचे अपहरण करून त्याचा निर्घृणपणे खून केला. याप्रकरणी पोलिसांनी आणखी दोघांना अटक केली. यापूर्वी पिंपरी पोलिसांनी यातील एकाला ताब्यात घेतले होते.अक्षय संजय भोसले उर्फ लिंगा, योगेश विठ्ठल टोणपे उर्फ लंगडा (दोघे रा. सांगवी) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. यापूर्वी पिंपरी पोलिसांनी अमिन फिरोज खान (रा. मोमिनपुरा, गंजपेठ, पुणे) याला ताब्यात घेतले आहे. शाहबाज सिराज कुरेशी (रा. कासरवाडी) आणि आरबाज शेख (रा. खडकी) या दोघांचा पोलीस शोध घेत आहेत. याप्रकरणी रोहीत किशोर सुखेजा (वय २६, रा. पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हितेश मुलचंदानी खून प्रकरणातील दोन आरोपी औंध येथील स्पायसर कॉलेज रोडवर येणार असल्याची माहिती पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेला मिळाली. त्यानुसार बुधवारी (दि. २४) रात्री पोलिसांनी स्पायसर कॉलेज रोड परिसरात सापळा रचून लिंगा आणि लंगडा यांना ताब्यात घेतले. गुन्ह्यात वापरलेली मोटार देखील त्यांच्याकडून जप्त केली. लिंगा आणि लंगडा दोघेही सांगवी पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. यापूर्वी पिंपरी पोलिसांनी अमिन फिरोज खान याला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणातील शाहबाज आणि आरबाज हे दोघेजण अद्याप फरार आहेत.पिंपरी कॅम्पात कँडलमार्चहितेश मुलचंदानी याच्या हत्येच्या निषेधार्थ पिंपरी कॅम्पात बुधवारी (दि. २४) सायंकाळनंतर शगुन चौक ते बाबा छत्तुरामलाल मंदिर दरम्यान कँडलमार्च काढण्यात आला. यात व्यापारी, व्यावसायिक, महिला व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. पिंपरी परिसरात पोलिसांची गस्त वाढवावी, पथारीवाले, हॉटेल, आईस्क्रिम पार्लर यासह अन्य दुकानेही रात्री उशिरापर्यंत सुरू असतात. ही सर्व दुकाने वेळेत बंद करण्यात यावीत, अशी मागणी सिंधी समाजबांधवांकडून करण्यात येत आहे.

टॅग्स :Deathमृत्यूMurderखूनpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडhotelहॉटेल