शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
2
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
3
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
4
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
5
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
6
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
7
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
8
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
9
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
10
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
11
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
12
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
13
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
14
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
15
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
16
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
17
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
18
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
19
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
20
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव

पीएमपीतून क्षमतेपेक्षा दुप्पट प्रवासी, धोकादायकरीत्या करावा लागतोय प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2018 00:44 IST

क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी भरून वाहतूक करणाऱ्या वाहनांवर मोटार वाहन कायद्यानुसार कारवाईचा बडगा उगारला जातो. मात्र, पुणे महानगर परिवहन मंडळाच्या (पीएमपीएमएल) बस मधून राजरोसपणे क्षमतेपेक्षा दुपटीने प्रवासी भरले जात असतानाही त्याकडे दुर्लक्ष होत आहे.

मंगेश पांडे पिंपरी : क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी भरून वाहतूक करणाऱ्या वाहनांवर मोटार वाहन कायद्यानुसार कारवाईचा बडगा उगारला जातो. मात्र, पुणे महानगर परिवहन मंडळाच्या (पीएमपीएमएल) बस मधून राजरोसपणे क्षमतेपेक्षा दुपटीने प्रवासी भरले जात असतानाही त्याकडे दुर्लक्ष होत आहे. धोकादायकरित्या प्रवासी वाहतूक करणाºया पीएमपी बसचा वारंवार अपघात होत आहेत.पीएमपीएमएलकडून सार्वजनिक प्रवासी वाहतूक सेवा पुरविली जात आहे. मात्र, ही सेवा पुरविताना मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन होत असल्याचे दिसून येते. दरम्यान, सर्वच वाहनचालकांकडून मोटार वाहन कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी होणे गरजेचे असताना पीएमपीकडून तसे होताना दिसून येत नाही. बसमध्ये सिटिंग ४८ व स्टँडिंग १८ प्रवासी क्षमता असलेल्या बसमध्ये तब्बल ८० ते ८५ प्रवासी बसविले जातात. नियमांचे उल्लंघन होत असतानाही त्याकडे वाहतूक पोलिसांकडून डोळेझाक केली जाते.>यंत्रणाअपयशीप्रदूषण कमी करण्यासाठी एकीकडे सार्वजनिक प्रवासी वाहनांचा वापर करण्याचे आवाहन केले जाते, तर दुसरीकडे ही सेवा पुरविण्यातच यंत्रणा अपयशी ठरत असल्याचे दिसून येत आहे. शहरातील अनेक मार्गांवर अधिक बसची आवश्यकता असतानाही त्याकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. त्यामुळे बसमध्ये अतिरिक्त प्रवासी भरले जातात. प्रमाणापेक्षा अधिक प्रवासी भरुन पीएमपीमधून प्रवाशांची धोकादायकरीत्या राजरोसपणे वाहतूक होत आहे. नियमांचे उल्लंघन करणाºया वाहनचालकांवर वाहतूक पोलिसांकडून कारवाईचा बडगा उगारला जातो. मात्र, पीएमपीकडूनही नियमांचे उल्लंघन होत असतानाही त्याकडे दुर्लक्ष होत आहे. सुरक्षित प्रवासी वाहतुकीसाठी शहरातील सर्व मार्गांवर पुरेशा प्रमाणात पीएमपी बस पुरविल्या जाणे अत्यावश्यक आहे.पीएमपीएमएलकडून सार्वजनिक प्रवासी वाहतूक सेवा पुरविली जात आहे. मात्र, ही सेवा पुरविताना मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन होत असल्याचे दिसून येते. बस मधून राजरोसपणे क्षमतेपेक्षा दुपटीने प्रवासी भरले जात असतानाही त्याकडे दुर्लक्ष होत आहे.>ताटकळत होतोय प्रवासपीएमपीतून प्रवास करताना अगोदरच अनेक गैरसोयींचा सामना करावा लागतो. खिळखिळ्या बस, तुटलेली आसने, सतत ब्रेकडाऊन, वेळापत्रक न पाळणे, थांब्यावर गाडी न थांबविता बस दामटणे अशी स्थिती पीएमपीची आहे. अशातच बसमध्ये भरल्या जाणाºया अतिरिक्त प्रवाशांमुळे अनेकांवर ताटकळत उभे राहून प्रवास करण्याची वेळ येते. प्रवासाचे भाडे शुल्क भरूनही त्या तुलनेत सुविधा मिळत नसल्याने प्रवासी संताप व्यक्त करतात.>चढ-उतार करणेही कठीणशहरातील प्रवासी संख्येच्या तुलनेत बसची संख्या अपुरी आहे. त्यामुळे मार्गावरील बसच्या फेºयाही कमी असल्याने बराच वेळ बस येत नाही. यामुळे प्रवाशांनाही नाईलाजास्तव धोकादायक प्रवास करावा लागतो. सायंकाळच्या वेळी तर प्रवाशी बस अक्षरश: ओसंडून वाहत असतात. प्रवाशांना बसमध्ये चढणे व उतरणेही कठीण होते. तरीही बस दामटल्या जातात. पीएमपी बसमध्ये नियमानुसार आसन क्षमतेच्या एक तृतीयांश प्रवासी उभे राहून प्रवास करू शकतात. मात्र, सध्या तसे होताना दिसत नाही. क्षमतेपेक्षा दीडपट ते दुप्पट प्रवासी बसमध्ये असतात.>प्रवाशांचीहोतेय गैरसोयपिंपरी-चिंचवड शहरात पुणे महानगर परिवहन मंडळाचे (पीएमपी) निगडी, भोसरी आणि पिंपरी हे तीन आगार आहेत. या आगारांमधून शहरासह लगतच्या विविध भागांत बस सुटतात. मात्र, या बस पुरेशा नसल्याने प्रवाशांची गैरसोय होते. बसमध्ये उभे राहून प्रवास करावा लागतो. अन्यथा इतर खासगी वाहनांतून जावे लागते. शहराचा विस्तार वाढत असून लोकसंख्याही वाढत आहे. मात्र, त्यातुलनेत पीएमपीची सेवा उपलब्ध नाही. संपूर्ण शहरासाठी तीन आगार असले तरी येथील बसची संख्या अपुरी आहे. त्यामुळे उपलब्ध बसवर ताण येत असून बसची संख्या वाढविण्यासह मार्गावरील फेºयाही वाढविण्याची मागणी होत आहे.>बसचीसंख्या अपुरीपीएमपी बस सोडून इतर खासगी बस व वाहनांवर अतिरिक्त प्रवासी भरणाल्याबद्दल कायद्याचे उल्लंघन होत असल्याने कायदेशीर कारवाई केली जाते. दंड आकारला जातो. मात्र, हाच नियम पीएमपी बसला नाही का?, असा सवाल उपस्थित केला जात आहे. बसमध्ये धोकादायकरित्या क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी भरले जातात. बसच्या दरवाजामध्ये काही प्रवासी अक्षरश: लोंबकळत असल्याचे चित्र पहायला मिळते. एखादी दुर्घटना घडल्यानंतर कारवाई होणार का ? असा सवाल उपस्थित केला जात आहे.