शहरं
Join us  
Trending Stories
1
युएन महासभेत गाझाचा मुद्दा; ट्रम्प यांनी मुनीर आणि शरीफ यांच्या पाठिंब्याचा केला खुलासा!
2
वांगचूक यांना सोडा; तरच लडाखबाबत केंद्राशी चर्चा करू! एलएबीच्या भूमिकेला केडीएचा ठाम पाठिंबा
3
४.५ लाख महिला अत्याचाराच्या बळी! देशात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले, महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी
4
गाझात युद्ध थांबविण्यासाठी ट्रम्प यांची २० कलमी योजना इस्रायलला मान्य!
5
बिहारमध्ये एकूण ७.४२ कोटी मतदार; एसआयआरपूर्वीपेक्षा ४७ लाख कमी
6
यंदाचा मान्सून ठरला 'घातक'; अतिवृष्टी, पूरामुळे देशात १,५२८ जणांचा गेला बळी! 
7
यशस्वी खेळाडू होण्यासाठी स्वत:प्रती प्रामाणिक राहा; व्हीव्हीएस लक्ष्मण यांचा नवोदित खेळाडूंना सल्ला
8
किशोरवयीन मुलांमध्ये जाणवते 'व्हिटॅमिन डी'ची कमतरता; अनेक गंभीर आजारांचा वाढतोय धोका
9
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
10
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
11
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
12
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
13
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
14
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
15
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
16
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
17
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
18
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
19
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
20
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 

चोवीस तास पाणीपुरवठा डिसेंबरपर्यंत, पिंपरी-चिंचवड महापालिकेची योजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2018 03:15 IST

स्मार्ट सिटी पिंपरी-चिंचवडची पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर झाली असून, सत्ताधाऱ्यांच्या तोंडचे पाणी पळण्याची वेळ आली आहे. चोवीस तास पाणीपुरवठ्यातील चाळीस टक्के भागाचे काम प्रगतिपथावर असून डिसेंबरपर्यंत पूर्ण होणार आहे.

पिंपरी - स्मार्ट सिटी पिंपरी-चिंचवडची पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर झाली असून, सत्ताधाऱ्यांच्या तोंडचे पाणी पळण्याची वेळ आली आहे. चोवीस तास पाणीपुरवठ्यातील चाळीस टक्के भागाचे काम प्रगतिपथावर असून डिसेंबरपर्यंत पूर्ण होणार आहे. तसेच, मार्चपर्यंत ही योजना नागरिकांसाठी कार्यान्वित होणार आहे. त्यामुळे पाणी टंचाईचे संकट टळण्यास मदत होणार आहे. पहिल्या टप्प्यासाठी आतापर्यंत सुमारे चाळीस कोटी खर्च झाला आहे.पुणे आणि मुंबई अशा दोन मेट्रोसिटीच्या मध्यावर असणाºया पिंपरी-चिंचवड महापालिकेची लोकसंख्या २१ लाखांवर पोहोचली़ नागरीकरण वाढल्याने एकमेव स्रोत असणाºया पवना धरणातील साठा कमी पडत आहे. गेल्या दहा वर्षांपासून बंदीस्त जलवाहिनी प्रकल्प लांबला आहे. तसेच भामा आसखेड आणि आंध्रा धरणातून पाणी आणण्याच्या प्रकल्पालाही गती मिळालेली नाही. त्यामुळे चोवीस तास पाणीपुरवठा योजनेच्या अंमलबजावणीची आवश्यकता आहे.पवना धरणातून नदीत पाणी सोडून रावेत येथील जल उपसा केंद्रातून जलवाहिन्यांच्या माध्यमातून शहरात पाणीपुरवठा केला जातो. दिवसाला ४६० एमएलडी पाण्याचे आरक्षण आहे. मात्र, लोकसंख्या वाढीचे प्रमाण पाहता पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवत आहे. एक मेपासून दिवसाआड पाण्याचे नियोजन महापालिका प्रशासनाने केले होते. मात्र, महापौर नितीन काळजे यांनी दिवसाआड पाण्यास विरोध केला आहे. त्यामुळे पाणी कपात होणार की नाही, याबाबत लोकप्रतिनिधी आणि सत्ताधारी यांच्यात एकमत नसल्याचे दिसून येते. केंद्राच्या जेएनएनयुआरएम अंतर्गत चोवीस तास पाणीपुरवठ्याची योजना सुरू झाली. पहिला प्रयोग यमुनानगर प्राधिकरणात करण्यात आला होता. मात्र, महापालिकेत भाजपाची सत्ता आल्याने शिवसेनेचे वर्चस्व असणाºया वॉर्डातील प्रकल्प प्रशासनाने गुंडाळला होता. त्यास नागरिकांनी विरोधही केला होता. त्यानंतर पहिल्या टप्प्याचे नियोजन महापालिका प्रशासनाने केले होते. या योजनेत या भागातील जलवाहिन्या आणि नळजोड बदलण्याचे काम करण्यात येणार आहे. एचडीपी पाईप आणि नळजोडांसाठी एमडीपी वापरले जाणार आहे.समान पाणीवाटपनियोजनाचा अभाव्ताामुळे महापालिका परिसरात पिण्याच्या पाण्याच्या गळतीचे प्रमाण हे चाळीस टक्के आहे. हे प्रमाण कमी करण्यासाठी आणि समान पाणी वाटपासाठी चोवीस तास पाणी योजना राबविली जात आहे. त्यातील चाळीस टक्के भागातील काम दीड वर्षांपासून सुरू आहे.चोवीस तास पाणीपुरवठा योजनेतील चाळीस टक्के भागाचे काम दीड वर्षांपूर्वी सुरू झाले. ते डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल. सध्या पाणीपुरवठ्यावर येणारा ताण कमी होणार आहे. तसेच गळती रोखून समान पाणीवाटप होणार आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर दुसºया टप्प्यात उर्वरित साठ टक्के भागाचेही काम केले जाणार आहे. त्यातील काही भागांचे काम सुरूही करण्यात आले आहे.- प्रवीण लडकत, कार्यकारी अभियंता, पाणी पुरवठा विभागदाट लोकवस्तीला होणार फायदा४चोवीस तास पाणी योजनेच्या पहिल्या टप्प्यात मोशी, दिघी, भोसरी, प्राधिकरण, चिंचवड, सांगवी या भागात कामे सुरू आहेत. संबंधित भाग हा दाट लोकवस्तीचा असल्याने तसेच या भागात पिण्याच्या पाण्याच्या तक्रारी अधिक आहेत. पहिल्या टप्प्यातील चोवीस तास पाणी पुरवठा योजनेचे काम पहिल्या टप्प्यात पूर्ण होणार आहे. त्यामुळे या भागांना फायदा होणार आहे. त्यासाठी सुमारे चाळीस कोटी खर्च अपेक्षित असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडWaterपाणी