शहरं
Join us  
Trending Stories
1
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
2
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
3
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
4
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
5
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
6
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
7
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
8
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
9
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
10
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
11
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
12
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
13
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
14
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
15
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?
16
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
17
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
18
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
19
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
20
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले

मुख्यमंत्र्यासाठी पाऊणतास तुकोबांचा सोहळा वेठीस 

By विश्वास मोरे | Updated: June 29, 2024 20:39 IST

वारकऱ्यांची नाराजी 

विश्वास मोरे, लोकमत न्यूज नेटवर्क, पिंपरी  :  जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज आषाढीवारी पालखी सोहळा शनिवारी सव्वा पाच वाजता उद्योगनगरीत प्रवेशाला. दरवर्षीपेक्षा पाऊणतास उशिराने सोहळा शहरात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोहळ्यात उपस्थित राहणार असल्याने निगडीतील भक्ती- शक्ती चौकामध्ये सोहळा थांबविला होता. मुख्यमंत्र्याची हौस यामुळे पाऊण तास वारकऱ्यांना त्रास झाला. त्यामुळे वारकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. 

पिंपरी-चिंचवड शहराच्या प्रवेशद्वारावर अर्थात भक्तीशक्ती चौकात सायंकाळी सव्वा पाचच्या सुमारास चौघडा पोहोचला. तर साडेसहापर्यंत सोहळा चौकातच थांबला होता. यावेळी नागरीकांनी पुष्पवृष्ठी केली. त्यावेळी पावसाने हजेरी लावली.  वारकऱ्यांची नाराजी 

पालखी सोहळा मार्गावर नदीप्रमाणे प्रवाही असतो. मात्र, सुमारे अर्धा तास सोहळा याच ठिकाणी थांबला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोहळ्यात सहभागी होणार आहेत, म्हणून सोहळा थांबला आहे, अशी चर्चाही  रंगली होती. त्यामुळे देहूरोड सुमारे तीन किलोमीटरपर्यंत वारकरी रस्त्यावर उभे होते. त्यानंतर पावणे सहाच्या सुमारास पुन्हा दिंड्या पुढे सरकू लागल्या. त्यानंतर पुन्हा काही काळ सोहळा थांबला. सोहळा का थांबला होता? याबाबतचे उत्तर सुरुवातीला मिळू शकले नाही. कारण पोलिसांनाही याबाबत खबर नव्हती. सुरुवातीला भक्ती- शक्ती चौकात मुख्यमंत्री येणार हॊते.  मात्र, नियोजित ठिकाणी आले नाहीत. उशीर होत असल्याने सोहळा पुढे सरकला. पावणे सातला टिळक चौकात आला. त्यावेळी आळंदीतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले. त्यांच्या बरोबर खासदार श्रीरंग बारणे होते. शिंदे आणि बारणे काही वेळवारीत पायी चालले. त्यानंतर रथावर बसून सारथ्यही केले. मुखमंत्र्यासाठी पाऊण तास सोहळा थांबविल्याबद्दल वारकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. कारण दिंड्याना नेहमीच्या वेळेपेक्षा मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचण्यास उशीर झाला.

टॅग्स :sant tukaram palkhiसंत तुकाराम पालखीSant Tukaram Maharaj palkhi Sohalaसंत तुकाराम महाराज पालखी सोहळाEknath Shindeएकनाथ शिंदेPandharpur Wariपंढरपूर वारी