शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

खराबवाडीत ट्राई वॉल पॅक कंपनीला आग लागून कोट्यवधींचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2018 20:48 IST

खराबवाडी ( ता.खेड ) येथील वाघजाईनगर मधील ट्राई वॉल पॅक प्रा. लि. या कागदी पुठ्ठयाचे उत्पादन करणाऱ्या कंपनीला आकस्मिकपणे आग लागून आगीत मशिनरी, कच्चा माल व इतर सामुग्री खाक होऊन अंदाजे साडेचार ते पाच कोटीचे नुकसान झाल्याची माहिती कामगार तलाठी शाम वालेकर यांनी दिली.

- हनुमंत देवकर चाकण - खराबवाडी ( ता.खेड ) येथील वाघजाईनगर मधील ट्राई वॉल पॅक प्रा. लि. या कागदी पुठ्ठयाचे उत्पादन करणाऱ्या कंपनीला आकस्मिकपणे आग लागून आगीत मशिनरी, कच्चा माल व इतर सामुग्री खाक होऊन अंदाजे साडेचार ते पाच कोटीचे नुकसान झाल्याची माहिती कामगार तलाठी शाम वालेकर यांनी दिली. वीस तासानंतर आग आटोक्यात आली. महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त कंपनीला सुट्टी असल्याने सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मंगळवारी ( दि. १ मे ) रोजी सकाळी आठ वाजता वाघजाई नगर येथील जमीन गट नंबर ३५७ मधील ट्राई वॉल पॅक प्रा. लि. या कंपनीला आकस्मिकपणे आग लागली. आग लागताच खराबवाडीचे माजी सरपंच हनुमंत कड, उद्योजक जीवन खराबी व लोकमतचे स्थानिक वार्ताहर हनुमंत देवकर यांनी त्वरित फायर ब्रिगेडला संपर्क केला. चाकण एमआयडीसी, फोक्सवॅगन, बजाज ऍटो, राजगुरूनगर नगरपरिषद यांचे एकूण सहा आगीचे बंब, पाण्याचे वीस टँकर्स, स्थानिक नागरिकांच्या सहकार्याने सलग वीस तास आग विझविण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. या आगीत एक कोटीचा कच्चा माल, तीन कोटींच्या मशिनरी, व एक कोटीपर्यंत बांधकाम स्ट्रक्चर आगीत जळून खाक झाले. आग आटोक्यात आणण्यासाठी एकूण सात लाख लिटर पाण्याचा वापर करण्यात आला. हे शेड ठाण्याचे पोलीस निरीक्षक कल्याण पवार यांच्या पत्नी ज्योती यांच्या नावावर असून १८ हजार स्क्वेअर फूट बांधकाम असलेल्या या कंपनीत कागदी पुठ्ठयाचे उत्पादन केले जाते. घटनास्थळी नायब तहसीलदार कानसकर व चाकणचे मंडलाधिकारी बाबासाहेब साळुंके यांनी भेट देऊन नुकसानीची पाहणी केली. तलाठी शाम वालेकर यांनी स्वतः फायर ब्रिगेडमार्फत आग विझविण्यास मदत करून झालेल्या नुकसानीचा पंचनामा केला. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. 

टॅग्स :fireआगpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड