शहरं
Join us  
Trending Stories
1
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
2
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
3
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७८ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
4
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
5
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या
6
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
7
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
8
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
9
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
10
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
11
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
12
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
13
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
14
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
15
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
16
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
17
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
18
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
19
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."
20
VIDEO: अरे देवा... माकडाने ट्रेकरला मध्येच गाठलं, आधी बॅग उचकली, मग पाठीवर चढलं अन् मग...

दहा वर्षांमध्ये कॅबमध्ये झाली तिप्पट वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2019 00:29 IST

आरटीओ नोंदणी : रिक्षामधून प्रवास करणाऱ्या नागरिकांची टॅक्सीलाच जादा पसंती

पुणे : कधीकाळी सायकलींचे शहर म्हणून ओळख असलेले पुणे शहर आता दुचाकींचे शहर म्हणून ओळखले जाते. तसेच राज्यात सर्वाधिक रिक्षाही पुण्यातच आहेत. पण बदलती जीवनशैली, उंचावलेले राहणीमान यांमुळे आता रिक्षामधून प्रवास करणारे अनेक नागरिक कॅबकडे वळू लागले आहेत. त्यामुळे मागील दहा वर्षांच्या तुलनेत टॅक्सी-कॅबची संख्या तब्बल तिपटीने वाढली आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून प्रवाशांचा भार वाहणाºया रिक्षाला कॅब टक्कर देत आहे.

वाढलेल्या शिक्षण, रोजगाराच्या संधी, लगतच्या परिसरात विस्तारलेले उद्योगधंदे अशा विविध कारणांमुळे पुणे शहराचा चेहरामोहरा बदलला आहे. सायकलींची जागा दुचाकी, चारचाकींनी घेतली. अनेक वर्षांपासून सार्वजनिक वाहतुक व्यवस्था म्हणून पुणे महानगर परिवहन महामंडळा (पुर्वीची पीएमटी) ला प्रवाशांकडून पसंती मिळू लागली. कालांतराने प्रवाशांचा ओढा रिक्षाकडे वाढत गेला. बससेवेच्या अनियमिततेमुळे रिक्षाची वाढ वेगाने होत गेली. आर्थिक वर्ष २००८-०९ मध्ये प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे सुमारे ६० हजार रिक्षांची नोंदणी झाली होती. त्यातुलनेत टॅक्सी किंवा कॅबची संख्या केवळ १० हजाराच्या घरात होती. मात्र, सध्या ही स्थिती बदलली आहे. चालु आर्थिक वर्षामध्ये ३१ जानेवारीपर्यंत कॅबची संख्या वाढली आहे.मागील पाच वर्षांपुर्वी रिक्षाला परवाना देणे बंद केल्यामुळे शहरातील रिक्षांची संख्या रोडावत गेली. त्यामुळे डिसेंबर २०१६ पर्यंत रिक्षांची संख्या ४५ हजारांपर्यंत खाली आली. हा परवाना पुन्हा जानेवारी २०१७ मध्ये खुला करण्यात आला. मात्र, या कालावधीमध्ये अनेक जण टॅक्सी-कॅबकडे वळावे. परिणामी कॅबची संख्या वाढत गेली. त्यातच तीन वर्षांपुर्वी शासनाने शहरात प्रवासी वाहतुकीला कॅबला मान्यता दिली. या निर्णयामुळे कॅबवर अक्षरश: उड्या पडल्या. २०१५-१६ पर्यंत सुमारे १० हजार कॅब होत्या. ही संख्या २०१६-१७ मध्ये तब्बल २२ हजारांच्या पुढे गेली. दि. जानेवारी २०१८ पर्यंत हा आकडा सुमारे ३४ हजारांवर पोहचला आहे. परवान्यावरील बंद उठल्यानंतर रिक्षाची संख्या वाढू लागली आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPuneपुणे