शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

अवाजवी बिलांचा झटका, दिघीकर त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2018 01:54 IST

परिसरातील नागरिक विजेच्या समस्यांनी ग्रासलेले असताना महावितरण कंपनीने आणखी एक नवी समस्या निर्माण करून दिघीकरांच्या समस्येत भर टाकली आहे.

दिघी - परिसरातील नागरिक विजेच्या समस्यांनी ग्रासलेले असताना महावितरण कंपनीने आणखी एक नवी समस्या निर्माण करून दिघीकरांच्या समस्येत भर टाकली आहे. महावितरणच्या कारभाराने आधीच त्रस्त असलेल्या वीज ग्राहकांना योग्य सुविधा मिळत नाहीत.वीजपुरवठा खंडित होणे नित्याचेच झाले आहे. शिवाय तक्रार दाखल केल्यानंतरसुद्धा तत्काळ कारवाई केली जात नसल्याचे सह्याद्री कॉलनीमधील घटना ताजी असताना महावितरणने वीज ग्राहकांना मोठ्या रकमेची बिले आकारून झटका दिला आहे. त्यामुळे परिसरात नागरिकांनी महावितरणच्या सावळ्या गोंधळाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.महावितरणचे कार्यकारी अभियंता मदन शेवाळे निवृत्त झाल्याने या विभागाचा कारभार अतिरिक्त कार्यकारी अभियंता बी. बी. भरणे यांच्याकडे आहे. त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, योग्य माहिती घेऊन नेमका प्रकार कशामुळे झाला आहे ते बैठकीमध्ये स्पष्ट होईल. बिलाच्या समस्येबाबत नागरिकांना सहकार्य करून समस्या सोडविल्या जातील. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये.दरम्यान दिघी आणि परिसरामध्ये वीजपुरवठ्याबाबत अनेक समस्या आहेत. याबाबत नागरिकांनी महावितरण कंपनीच्या संबंधित अधिकाऱ्यांकडे सातत्याने तक्रारी केल्या. मात्र, अधिकाºयांकडून त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यात वाढीव आणि चुकीच्या बिलांमुळे नागरिकांच्या संतापात भर पडली.दिघीतील वीज ग्राहकांना त्यांच्या चालू बिलामध्ये मागील भरलेले बिल जोडून आले आहे. तर काही नागरिकांच्या बिलावरील चालू रीडिंग व मागील रीडिंग सारखे दाखवले असून अंदाजे दोनशे युनिटचे बिल आकारण्यात आली आहेत.काही बिलावरील मीटर रीडिंगचे फोटो गायब झाले आहेत तर काही फोटो अस्पष्ट दिसून येत आहेत. या सर्व गोंधळामुळे नागरिक मोठ्या पेचात सापडले आहेत.महावितरणच्या कार्यालयात माहिती घेतली असता सॉफ्टवेअरची समस्या झाल्याचे सांगत जबाबदारी झटकण्यात येत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. भरलेली बिले वाढवून परत आल्याने ती कमी होतीलही; परंतु त्या कामाकरिता भोसरी गाठून वेळ द्यावा लागणार. त्यामुळे वेळ व आर्थिक भुर्दंड सहन करण्याची वेळ महावितरणने आणली आहे.

टॅग्स :electricityवीजpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड