शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

ट्रामा सेंटर सुरू करण्याच्या हालचाली, खासगी रुग्णालयाला दिले भाडेतत्त्वावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2018 01:45 IST

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील अपघातांमधील जखमींना तातडीचे उपचार मिळावेत यासाठी शासनाने ७० लाख रुपये खर्च करून ओझर्डे गावच्या हद्दीत नऊ एकर जागेवर ट्रामा सेंटर व हेलीपॅडची उभारणी केली.

वडगाव मावळ  - पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील अपघातांमधील जखमींना तातडीचे उपचार मिळावेत यासाठी शासनाने ७० लाख रुपये खर्च करून ओझर्डे गावच्या हद्दीत नऊ एकर जागेवर ट्रामा सेंटर व हेलीपॅडची उभारणी केली. गेल्या चार वर्षांपासून ही इमातर धूळ खात आहे. याबाबत ‘लोकमत’ने १६ सप्टेंबर रोजी सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले होते. याची दखल घेत रस्ते विकास महामंडळाने ट्रामा सेंटर सुरू करण्याबाबत कार्यवाही सुरू केली आहे.मुंबई-पुणे हा ९३ किलोमीटर लांबीचा द्रुतगती मार्ग २००२ मध्ये वाहतुकीसाठी खुला झाला. हा मार्ग उपयुक्त आणि सोईचा असला तरी वाहतुकीच्या नियमाचे उल्लंघन करून वेगाने वाहन चालवणाऱ्या वाहनचालकांमुळे या मार्गावर अपघाताच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. हजारो प्रवाशांचे बळी गेले आहेत. खोपोली व कळंबोलीदरम्यान होणाºया अपघातग्रस्तांच्या उपचारासाठी एमजीएम रुग्णालय कळंबोली तर किवळे ते खंडाळादरम्यानच्या अपघातग्रस्तांच्या उपचारासाठी निगडी येथील लोकमान्य रुग्णालय असे दोनच पर्याय आहेत. परंतु ही दोन्ही रुग्णालयांत जखमींना नेण्यासाठी एक तासाचा कालावधी लागतो. प्राथमिक उपचारविना अनेक वेळा जखमींचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत.शासनाला कधी जाग येणारगेल्या चार वर्षांपासून ही इमारत धूळ खात आहे. इमारतीला गवताचा वेढा आहे. हेलीपॅड उखडले आहे. अपघातातील जखमींना तातडीने उपचार मिळत नसल्याने मृतांच्या संख्येत वाढ होत आहे. सोळावर्षांत बळींची संख्या काही हजारांवर गेली आहे. अजून किती बळीगेल्यावर शासनाला जाग येणार, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित करण्यात येत आहे.महामार्गावर अपघात झाल्यास तातडीने वैद्यकीय उपचार मिळण्यासाठी उभारलेल्या ट्रामा सेंटर प्रकल्प उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असल्याने जखमींची गैरसोय होत आहे. हस्तांतराच्या वादात हा प्रकल्प सुरू होण्यास विलंब होत आहे. त्यामुळे नाराजी व्यक्त केली जात आहे.द्रुतगती महामार्गावर ट्रामा सेंटर सन २०२८ पर्यंत पवना हॉस्पिटलला भाडेतत्त्वावर देण्यात आले आहे. त्यासाठी मंजुरीही दिली आहे. लवकरच हे ट्रामा सेंटर सुरू होईल. त्यामुळे द्रुतगती मार्गावरील अपघातातील जखमींना तत्काळ उपचार मिळतील.नम्रता रेड्डी, कार्यकारी अभियंता,रस्ते विकास महामंडळ

टॅग्स :hospitalहॉस्पिटलpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड