शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पारंपरिक खेळ झाले कालबाह्य, तंत्रज्ञान युगात बलतोय बालदिन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2018 00:49 IST

तंत्रज्ञान युग : मोबाइल गेमकडे वाढला मुलांचा कल; आक्रसतेय शारीरिक क्षमता

मोशी : शहर व परिसरात शालेय विद्यार्थी, लहान मुले यांच्यात पारंपरिक मैदानी खेळाचा लोप पावत चालला असून, तंत्रज्ञानाच्या युगात केवळ मोबाइलवर गेम खेळण्याकडे कल वाढल्याचे चित्र दिसून येत आहे. पूर्वीच्या काळात पारंपरिक खेळाबरोबर मुले मैदानी खेळालाही विशेष प्राधान्य देत आहेत. त्यामुळे शारीरिक व्यायामदेखील होत असे. पूर्वीचे पारंपरिक खेळ मोबाइलमधल्या गेममुळे कालबाह्य ठरले असून, आता फक्त त्यांच्या आठवणीच उरल्या आहेत. आजकालच्या मुलांना आट्या-पाट्या, सूरपारंब्या, विटी-दांडू, लगोरी, लपाछपी, भातुकली यांसारखे खेळ माहीतदेखील नाहीत. त्याऐवजी लहान मुलांना मोबाइल मधल्या अँग्री बर्ड, कँडी क्रश, टेम्पल रन, सबवे सर्फ यांसारख्या गेम पटकन लक्षात येत असून, त्याकडे जास्त कल असल्याचे दिसते.आजकालच्या मुलांना आट्या-पाट्या, सूरपारंब्या, विटी-दांडू, लगोरी, लपाछपी, भातुकली यांसारखे खेळ सांगायला गेलात, तर ते तुम्हालाच ‘हे कोणते खेळ?’ असा उलट प्रश्न विचारतील. त्यांची तरी काय चूक, कारण आता ना ते खेळ राहिले ना खेळाचे क्रीडांगण. मात्र या खेळाबरोबर अनेक चांगल्या गोष्टी काळाआड जात आहेत.सागर गोट्या, कानगोष्टी, सारिपाट, नवा व्यापारी, सापशिडी यांसारखे बैठे खेळ तर आता कोणी खेळतच नाही. आणि बुद्धिबळ, कॅरम, खो-खो, कबड्डी हे खेळदेखील स्पर्धांपुरतेच मर्यादित झाले आहेत. गावाता ठरावीक ठिकाणीच मैदानी खेळ खेळले जात असून, इतर खेळ कालबाह्य ठरत आहेत.सुरुवातीच्या काळामध्ये खो-खो, कबड्डी, बुद्धिबळ, क्रिकेट यासारखे खेळ खेळण्याकडे मुलांचा कल असे; परंतु सध्याच्या युगामध्ये असे खेळ नावापुरतेच मर्यादित असून, गाव पातळीवरही लहान मुलांच्या हातात मोबाइल असल्याचे दिसून येते. लहान मुले मोबाइलवर तासन्तास गेम खेळण्यात मग्न असल्याचे दिसते. पूर्वीचे पारंपरिक खेळ मोबाइलमधल्या गेममुळे कालबाह्यच ठरले असून, आता फक्त त्यांच्या आठवणीच उरल्या आहेत.

खेळामुळे मुले घराबाहेर पडत. त्यांच्या कल्पनाशक्तीचा वापर करून नवनवीन खेळ ते स्वत: तयार करत व त्याचे नियमही ते स्वत: बनवत असत. त्यामुळे मुलांमध्ये नेतृत्वगुण वाढीस लागे व बौद्धिक क्षमतेला चालना मिळत असे. तसेच या जुन्या खेळांमुळे मिळणारा शारीरिक व्यायाम, एकाग्रता अशा अनेक गोष्टी व्हिडीयो गेममधून मुलांना कधीच मिळू शकत नाहीत. त्यामुळे पालकांनीही याकडे लक्ष देण्याची गरज असून, मुलाना मैदानी व पारंपरिक खेळाबाबत माहिती करून देणे गरजेचे आहे.

टॅग्स :children's dayबालदिनPuneपुणे