शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

चऱ्होलीतील ‘टीपी’ अखेर रद्द; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा  

By ज्ञानेश्वर भंडारे | Updated: June 18, 2025 20:43 IST

 पिंपरी-चिंचवडमधील विविध विकासकामांचे उद्घाटन

पिंपरी : शहरवासियांना विश्वासात घेतल्याशिवाय शहराचा विकास करता येणार नाही. त्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने प्रस्तावित केलेला चऱ्होलीतील नगरविकास योजनेचा (टीपी) आराखडा रद्द करण्यात येत आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी केली.

पिंपरी-चिंचवडमधील चिखली येथे जगद्गुरू संत तुकाराम महाराज संतपीठाचे कलादालन व सभागृह, संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत नामदेव महाराज यांच्या भेटीच्या समूहशिल्पाचे लोकार्पण, विविध विकासकामांचे उद्घाटन आणि भूमिपूजन मुख्यमंत्री फडणवीस यांच्याहस्ते झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे, खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेश लांडगे, शंकर जगताप, उमा खापरे, अमित गोरखे, श्रीकांत भारतीय, माजी आमदार अश्विनी जगताप, भाजपचे शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, नितीन काळजे, राहुल जाधव, आयुक्त शेखर सिंह आदी उपस्थित होते. फडणवीस म्हणाले की, या संतपीठाला वैश्विक स्वरूप दिले असून येथे संपूर्ण संतसाहित्य सीबीएससी अभ्यासक्रमाच्या माध्यमातून संस्कृत, मराठी, हिंदी व इंग्रजी या चारही भाषांमधून शिकविले जाणार आहे. विविध वाद्ये वाजविण्याचे प्रशिक्षणही देण्यात येणार आहे. संतपीठाने तयार केलेल्या संकल्प आराखड्यानुसार पंढरपूर व आळंदी येथे उभारण्यात येणाऱ्या संतपीठाला शासन मदत करेल. ते म्हणाले की, नवीन शैक्षणिक धोरणामुळे मराठी भाषेला वैश्विक भाषा, ज्ञानभाषा व अर्थकारणाची भाषा बनविण्याचे दालन खुले केले आहे. महाराष्ट्रातील सर्व शाळांमध्ये मराठी भाषा अनिवार्य करण्यात आली आहे.

संतपीठाचे संचालक डॉ. मोरे म्हणाले की, पिंपरी-चिंचवड महापालिकेने संत परंपरा जपणारी शाळा स्थापन केली आहे. विकसित भारताच्या ध्येयपूर्तीसाठी संतपीठाचा मोलाचा सहभाग असेल.ये पब्लिक है, ये सब जानती है‘आम्ही काम करत आहोत. त्याचे श्रेय दुसरेच घेत आहेत’, अशी खंत आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केली होती. त्यावर फडणवीस म्हणाले की, महेश लांडगे खूप चिंता व्यक्त करत आहेत. श्रेय घेण्याबाबत मी सांगतो की, ये पब्लिक है, ये सब जानती है. आपण दुसऱ्याचे श्रेय घेऊ शकत नाही आणि आपले श्रेय दुसरा कोणी घेऊ शकत नाही. त्यामुळे फार चिंता करायची नाही. आपण काम करत राहायचे. जनतेचा तुमच्यावर विश्वास आहे. ते आपण निवडणुकीत पाहिले.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रPuneपुणेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसmahesh landgeमहेश लांडगे