शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

अभ्यासाच्या नावाखाली पालिका अधिकाऱ्यांची ‘पर्यटन शाळा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2018 14:02 IST

पिंपरी पालिकेचे काम बंद ठेवत पर्यटनाच्या ठिकाणी जाऊन शहर विकासाचे नियोजन केले जाणार आहे....

ठळक मुद्देस्मार्ट सिटी आणि शहर परिवर्तनाच्या नावाखाली ते करदात्यांच्या पैशाची उधळपट्टी अंदाजे एक लाख नव्वद हजार रुपये तसेच इतर खर्च पंधरा हजार असा एकूण सव्वा दोन लाख रुपये खर्च होणार

पिंपरी : महापालिकेतील अधिकारी काम बंद ठेवून पर्यटनाच्या ठिकाणी जाऊन शहर विकासाचे कसले नियोजन करणार आहे. गरुडमाची हे मोठे पर्यटन स्थळ आहे.कार्यक्रम नियोजनात निसर्गदर्शनाचा हेतू अधिकाऱ्यांचा असण्याची शक्यता आहे. शहर परिवर्तन कार्यशाळेच्या नावाखाली पालिका अधिकारी दोन दिवस मुळशीतील गरुडमाची येथे जाणार आहेत. या पर्यटनाच्या ठिकाणी त्यांची कार्यशाळा होणार आहे. वास्तविक यशदा किंवा शहरातील आटो क्लस्टर, नाट्यगृहात देखील कार्यशाळा झाली असती. परंतु, मुळशीतील गरुडमाची या निसर्गस्थळी जाऊन पालिकेचे अधिकारी शहर नियोजन करणार की पर्यटन, असा सवाल सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी उपस्थित केला आहे. सिटी ट्रान्फॉरमेशन आॅफिसच्या वतीने महापालिकेच्या पैशांतून कार्यशाळा आयोजित केली आहे. याबाबत भापकर म्हणाले, यशदा किंवा शहरातील महापालिकेच्या आॅटो क्लस्टर, रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, भोसरीतील अंकुशराव लांडगे, निळू फुले नाट्यगृह याठिकाणी देखील या कार्यशाळेचे आयोजन होऊ शकले असते.परंतु, अधिकाऱ्यांना मुळशीत जाऊन कार्यशाळा घेण्यात काय रस आहे. पालिकेचे काम बंद ठेवत पर्यटनाच्या ठिकाणी जाऊन शहर विकासाचे कोणते नियोजन केले जाणार आहे. कसले धोरण आखले जाणार आहे. गरुडमाची हे मोठे पर्यटन स्थळ आहे. कार्यक्रमाच्या नियोजनात निसर्गदर्शन देखील ठेवले आहे. आयुक्तांना कसलेही व्हिजन नाही. स्मार्ट सिटी आणि शहर परिवर्तनाच्या नावाखाली ते करदात्यांच्या पैशाची उधळपट्टी करत आहेत. कार्यशाळेला जाण्या-येण्यासाठी पन्नास आसनांची बस व्यवस्था करण्यात येणार आहे. त्यासाठी प्रवासी वाहतूक खर्च वीस हजार रुपये होणार आहे. कार्यशाळेत कॉन्फरन्स हॉल, प्रोजेक्टर, साऊंड सिस्टीम, मायक्रोफोन्स, स्लाईड चेंजर, व्हाईट बोर्ड, पाणी व्यवस्था, पन्नास जणांचे चहापान, दुपारचे व रात्रीचे जेवण, राहण्याची व्यवस्था, यासाठी अंदाजे एक लाख नव्वद हजार रुपये तसेच इतर खर्च पंधरा हजार असा एकूण सव्वा दोन लाख रुपये खर्च होणार आहे. हा खर्च रोख स्वरूपात करायचा असल्याने थेट पद्धतीने केला जाणार आहे.

टॅग्स :Puneपुणे