आठ तोळ्यांचे दागिने हिसकावले

By Admin | Updated: October 10, 2016 02:30 IST2016-10-10T02:30:24+5:302016-10-10T02:30:24+5:30

पती व मुलांसोबत जात असलेल्या एका पादचारी महिलेच्या गळ्यातील एक लाख ६८ हजारांचे साडेआठ तोळ्यांचे सोन्याचे दागिने दुचाकीवरून आलेल्या

Took eight ornaments ornaments | आठ तोळ्यांचे दागिने हिसकावले

आठ तोळ्यांचे दागिने हिसकावले

देहूरोड : पती व मुलांसोबत जात असलेल्या एका पादचारी महिलेच्या गळ्यातील एक लाख ६८ हजारांचे साडेआठ तोळ्यांचे सोन्याचे दागिने दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी हिसकावून पोबारा केला. ही घटना देहूरोड येथे मुंबई-पुणे महामार्गावर रविवारी दुपारी पावणेचारच्या सुमारास घडली.
शीतल कैलास सोनवणे (वय ३६, रा. समता कॉंलनी, रहाटणी) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात याप्रकरणी फिर्याद दिली आहे. शीतल या त्यांचे पती व दोन मुलांसह महामार्गावरून बन्सल रुग्णालयात प्रसृत झालेल्या चुलत बहिणीला भेटण्यास रविवारी दुपारी पावणेचारच्या सुमारास जात होते. सचिन वाइन्ससमोर समोरून आलेल्या काळ्या रंगाच्या दुचाकीवरील दोन चोरट्यांनी शीतल यांच्या गळ्यातील साडेसहा
तोळ्यांचे सोन्याचे गंठण, दीड तोळ्याचे मंगळसूत्र आणि अर्धा तोळ्याची सोनसाखळी असा सुमारे एक लाख ६८ हजारांचा ऐवज हिसकावून महामार्गावरून तळेगावच्या दिशेने पोबारा
केला आहे. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक अजित दळवी करीत आहेत. (वार्ताहर)

Web Title: Took eight ornaments ornaments