शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

ट्रकला धडक बसल्यानं बाईकवरील तीन तरुणांचा जागीच मृत्यू  

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2017 17:35 IST

पुणे-बंगळुरू महामार्गावर उभ्या असलेल्या टेम्पोला पाठीमागून येणा-या बाईकची जोरदार धडक बसून झालेल्या अपघातात बाईकवरील तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे.

पिंपरी चिंचवड, दि. 30 - पुणे-बंगळुरू महामार्गावर उभ्या असलेल्या टेम्पोला पाठीमागून येणा-या बाईकची जोरदार धडक बसून झालेल्या अपघातात बाईकवरील तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे.  हा अपघात मंगळवारी उशीरा रात्री 1.15 वाजण्याच्या सुमारास झाला. हे तिघंही मूळचे बिहारमधील रहिवासी असून ते एमबीएच्या शिक्षणासाठी पुण्यात रहात होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विपुल राजसिंग (वय २५), अमन राज (वय १९) आणि अश्विन अमरकुमार अगरवाल (वय १८ ) अशी मृत पावलेल्या तरुणांची नावं आहेत.  या प्रकरणी टेम्पोचालक शिवा सोमनाथ राठोड (वय ३०) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रजतराज सिंग याने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.  विपुल, अमन आणि अश्विन तिघे कोथरूड येथील एका नामांकित महाविद्यालयात एमबीएचे शिक्षण घेत होते.  ते मूळचे बिहारचे  आहेत.   मंगळवारी रात्री ते  दुचाकीवरून (वाहन क्रमांक बीएचआर १ बीआर ७४०२) हॉटेलमध्ये जेवणासाठी गेले होते. विपुल दुचाकी चालवत होता. जेवण झाल्यानंतर परत येत असताना पुणे-बंगळुरू महामार्गावरील बावधान येथे विपुलचं बाईकवरील नियंत्रण सुटल्याने त्यांच्या बाईकची रस्त्यावर उभ्या असलेल्या  टेम्पोला (वाहन क्रमांक, एमएच १२ एमव्ही ५४२८)  जोरात धडक बसली. या अपघातात विपुल, अमन आणि अश्वीन या तिघांचा जागीच मृत्यू झाला. हिंजवडी पोलीस अधिक तपास करत आहेत. 

टॅग्स :Accidentअपघात