शहरं
Join us  
Trending Stories
1
म्हणे, परमेश्वराचे बोलावणे आले, आम्ही ८ सप्टेंबरला देहत्याग करणार, अनंतपुरात २० भाविकांच्या निर्णयाने प्रशासनात खळबळ
2
ड्रीम-11ने भारतीय संघाची स्पॉन्सरशिप सोडली! आशिया कपपूर्वीच BCCI ला मोठा धक्का; किती पैसा मिळायचा?
3
१७ चौकार, पाच षटकार.. १४२ धावांचा धमाका; ऑस्ट्रेलियन 'हेड'मास्तरांनी घेतली आफ्रिकेची शाळा
4
Dream 11 आता सुरू करणार 'हा' नवा बिझनेस; ऑनलाइन मनी गेमिंग बॅननंतर नव्या क्षेत्रात एन्ट्री घेण्याची तयारी
5
भटक्या कुत्र्यांचे प्रकरण: SC आदेशानंतर केंद्राचे राज्यांना निर्देश; ७० टक्के श्वानांचे लसीकरण अनिवार्य
6
'चांगली डील मिळेल तिथूनच तेल खरेदी करू'; अमेरिकेच्या टॅरिफवर भारताची रोखठोक भूमिका
7
जनावरासारखी कोंबली होती माणसं; भाविकांच्या ट्रॉलीला कंटेनरची धडक, ८ मृत्यूमुखी, ४३ गंभीर जखमी
8
Wife सोबत एकत्र Post Office च्या 'या' स्कीममध्ये करा गुंतवणूक, महिन्याला मिळेल ₹९२५० चं फिक्स व्याज
9
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना सकारात्मक, विविध लाभ; ६ राशींना संमिश्र; पैसे उसने देऊ नये!
10
आजचे राशीभविष्य, २५ ऑगस्ट २०२५: आजचा दिवस लाभदायी, वाद-विवाद टाळा, वाणीवर संयम ठेवा !
11
'निवडणूक आयोग-भाजपचे साटेलोटे; मतांची चोरी करू देणार नाही', राहुल गांधींनी ठणकावले
12
साहेब ! पाचवीतील विद्यार्थ्याचा पास संपला म्हणून त्यास भर पावसात बसमधून खाली उतरणार का?
13
विशेष लेख: जरा संभलके, बडे धोखे है इस राह में...
14
भारताने रशियाच्या तेलाबद्दल ट्रम्प यांचे मत गांभीर्याने घ्यावे, निक्की हेली यांचं विधान
15
झारखंडचे माजी मुख्यमंत्री चंपई सोरेन नजरकैदेत, नेमके प्रकरण काय? 
16
मंदिरांत राजकीय उपक्रम नकोत; खातरजमा करा, केरळमधील देवस्वोम मंडळांना कोर्टाचे निर्देश
17
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
18
अधिक काम करतो, पण मोबदलाही द्या; वाढत्या कामामुळे होतोय जगण्यावर नकारात्मक परिणाम
19
दिल्ली पोलिसांचे वॉरंट्स आता व्हॉट्सॲपद्वारे, पोलिस ठाण्यातून व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे साक्ष 
20
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी

तीन महिन्यांत ठरणार पूररेषा

By admin | Updated: April 16, 2016 03:52 IST

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावरून महापालिकेने नोटीस बजावलेल्या नदीपात्रातील वसाहतींच्या संदर्भात आयुक्त कुणाल कुमार यांच्या कार्यालयात पाटबंधारे खात्यांच्या अधिकाऱ्यांसह

पिंपरी : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावरून महापालिकेने नोटीस बजावलेल्या नदीपात्रातील वसाहतींच्या संदर्भात आयुक्त कुणाल कुमार यांच्या कार्यालयात पाटबंधारे खात्यांच्या अधिकाऱ्यांसह संयुक्त बैठक झाली. त्यात संपूर्ण पुणे आणि पिंपरी-चिंचवड पूररेषा प्रत्यक्ष नदीपात्रात जाऊन मार्किंग करून निश्चित करण्याचा निर्णय घेण्यात आला. येत्या तीन महिन्यांत पाटंबधारे खाते अन्य खात्यांच्या सहकार्याने हे काम पूर्ण करणार आहे.पालिकेने नदीपात्र बांधलेल्या रस्त्याच्या संदर्भात राष्ट्रीय हरित लवादात दाखल झालेल्या याचिकेत पालिकेच्या विरोधात निर्णय लागला. तो सर्वोच्च न्यायालयात कायम झाला. त्यामुळे पालिकेला तो रस्ता तर उखडावा लागलाच, शिवाय पूररेषेच्या आत बांधकाम झालेल्या सर्व वसाहतींनाही नोटीस बजवावी लागली. सुमारे २५ वसाहतींमधील ४५० कुटुंबांच्या घरांवर त्यामुळे टांगती तलवार निर्माण झाली आहे. या कुटुंबांच्या मते, आमची जागा पूररेषेच्या बाहेर आहे, अशा पाटबंधारे खात्याने दिलेल्या ना हरकत प्रमाणपत्रानंतरच इमारतींचे बांधकाम झाले आहे. पाटबंधारे खात्याला मात्र ते अमान्य आहे. याच संदर्भात आयुक्त कुणाल कुमार यांच्या पुढाकाराने त्यांच्या कार्यालयात पाटबंधारे खात्याचे वरिष्ठ अभियंते, या वसाहतींनी एकत्रित येऊन स्थापन केलेल्या एकता नगर रहिवासी संघटनेचे पदाधिकारी व महापालिकेचे काही अधिकारी यांची संयुक्त बैठक झाली.पूररेषा पाटबंधारे खात्याच्या नकाशात असली, तरी पालिकेच्या विकास आराखडा नकाशावर नसल्याचे या वेळी निदर्शनास आले. मागणी झाली की, त्या त्या परिसराची पूररेषा निश्चित केली जाते. त्यामुळे हा प्रश्न निर्माण झाला असल्याचे माजी महापौर धनकवडे यांनी सांगितले. असे न करता संपूर्ण शहराची पूररेषा एकदाच निश्चित करावी व नकाशाबरोबरच प्रत्यक्ष जागेवर जाऊन संपूर्ण नदीपात्रातही या पूररेषेचे मार्किंग करावे, असे त्यांनी सुचवले. आयुक्त कुणाल कुमार यांनी ही सूचना मान्य केली. (प्रतिनिधी)संपूर्ण शहरातील पूररेषेचे असे मार्किंग प्रत्यक्ष नदीपात्रात झाले, तर त्यातून कोणती बांधकामे धोक्याच्या रेषेच्या आत आहेत, ते स्पष्ट होणार आहे. त्यातून त्यांचाही प्रश्न उपस्थित होण्याची शक्यता आहे. येत्या तीन महिन्यांत हे काम पूर्ण करायचा निर्णयही बैठकीत झाला.