शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरी-चिंचवड मध्ये अल्पवयीन तीन मुली व दोन मुलांना फूस लावून पळवून नेले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2019 15:37 IST

अल्पवयीन मुलींना फूस लावून पळवून नेल्याचे तीन वेगवेगळे प्रकार पिंपरी-चिंचवड शहरात घडले..

ठळक मुद्देनिगडी, चिखली व वाकड पोलीस ठाण्यात अपहरणाचे गुन्हे दाखल

पिंपरी : अल्पवयीन मुलींना फूस लावून पळवून नेल्याचे तीन वेगवेगळे प्रकार पिंपरी-चिंचवड शहरात घडले. तसेच दोन अल्पवयीन मुलांनाही फूस लावून पळवून नेले. निगडी पोलीस ठाण्यात तीन तर चिखली आणि वाकड पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निगडीतील ओटास्किम येथून एका १५ वर्षीय मुलीला आमिष दाखवून फूस लावून पळवून नेले. मंगळवारी (दि. २१) दुपारी सव्वाबाराच्या सुमारास हा प्रकार घडला. याप्रकरणी मुलीच्या ३७ वर्षीय आईने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. राहुल दत्ता कुदळे (रा. दळवीनगर, पत्राशेड, ओटास्किम, निगडी) असे आरोपीचे नाव आहे. दुसऱ्या प्रकरणात १७ वर्षे आठ महिने वयाच्या मुलीला कोणीतरी कशाचेतरी अमिष दाखवून फूस लावून पळवून नेले. दि. १३ मे रोजी हा प्रकार घडला. मुलीच्या ४८ वर्षीय आईने याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात मंगळवारी (दि. २१) फिर्याद दिली. तर १४ वर्षे नऊ महिने वयाच्या मुलाला कशाचे तरी अमिष दाखवून फूस लावून पळवून नेले. अल्पवयीन मुलाच्या ३८ वर्षीय आईने याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.चिखलीतील मोरेवस्ती येथून १६ वर्षीय मुलीला कशाचे तरी अमिष दाखवून फूस लावून पळवून नेले. सोमवारी (दि. २०) हा प्रकार घडला. मुलीच्या ३५ वर्षीय आईने मंगळवारी (दि. २१) चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.चुलत्याकडे जातो असे सांगून गेलेला १७ वर्षीय मुलगा परतला नाही. त्यास कोणीतरी फूस लावून पळवून नेले. सोमवारी (दि. २०) हा प्रकार घडला. मुलाच्या वडिलांनी मंगळवारी (दि. २१) याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस