शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

‘आयटीआय’चे दीड हजारांत शिक्षण, महापालिकेचा उपक्रम, शहराबाहेरील विद्यार्थ्यांना वाढीव शुल्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2017 03:10 IST

महापालिकेच्या मोरवाडी आणि कासारवाडी येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शहरातील विद्यार्थ्यांना दीड हजार रुपयांमध्ये औद्योगिक प्रशिक्षण मिळणार आहे. मात्र, शहराबाहेरील प्रशिक्षणार्थींना या शुल्काच्या दोन ते अडीचपट शुल्क मोजावे लागणार आहे.

पिंपरी : महापालिकेच्या मोरवाडी आणि कासारवाडी येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शहरातील विद्यार्थ्यांना दीड हजार रुपयांमध्ये औद्योगिक प्रशिक्षण मिळणार आहे. मात्र, शहराबाहेरील प्रशिक्षणार्थींना या शुल्काच्या दोन ते अडीचपट शुल्क मोजावे लागणार आहे. तर परप्रांतातील प्रशिक्षणार्थींना मोरवाडी आयटीआयमध्ये २० हजार आणि कासारवाडी आयटीआयमध्ये १० हजार रुपये वार्षिक शुल्क भरावे लागणार आहे. विरोधकांची उपसूचना न घेता, मूळ विषय सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला.महापालिकेने १९९२ मध्ये मोरवाडी आयटीआयची तर २००६ मध्ये मुलींसाठी कासारवाडी आयटीआयची स्थापना केली. ज्या वेळी आयटीआय सुरू झाले तेव्हा ३-४ ट्रेड शिकविण्यात येत. त्या वेळी आस्थापना खर्च, कच्चा माल, साहित्य खर्च कमी होता. तथापि, मोरवाडी आयटीआयमध्ये १४ अभ्यासक्रम शिकविले जात आहेत. १४ अभ्यासक्रमांच्या ३६ तुकड्यांमध्ये ८०६ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. तर कासारवाडी येथील मुलींच्या आयटीआयमध्ये ६ अभ्यासक्रमाच्या सहा तुकड्यांमध्ये १५१ विद्यार्थी शिकत आहेत.औद्योगिक प्रशिक्षण संस्थांसाठी राज्य सरकारने आॅगस्ट २०१५ मध्ये नवीन प्रवेश नियमावली तयार केली. तसेच, प्रशिक्षण शुल्कही निश्चित केले. मशिनगट अभियांत्रिकी ट्रेडसाठी प्रतिवर्ष ३० हजार रुपये, बिगर मशिनगट अभियांत्रिकी ट्रेडसाठी २५ हजार आणि बिगर अभियांत्रिकी ट्रेडसाठी २० हजार रुपये मूलभूत प्रशिक्षण शुल्क म्हणून आकारण्याचे आदेश दिले. मात्र, नगरसेवकांनी शुल्क वाढ कमी करावे, अशी मागणी केली. त्यानुसार, सुधारित प्रवेश प्रक्रिया आणि प्रशिक्षण शुल्क धोरण- २०१७ हा मसुदा तयार केला. त्यानुसार महापालिका हद्दीतील प्रशिक्षणार्थींसाठी मोरवाडी आणि कासारवाडी आयटीआयमध्ये दीड हजार रुपये वार्षिक प्रशिक्षण शुल्क राहणार आहे. हद्दीबाहेरील प्रशिक्षणार्थींसाठी पाच हजार रुपये, राज्याबाहेरील प्रशिक्षणार्थींसाठी मोरवाडी आयटीआयमध्ये २० हजार रुपये आणि कासारवाडी आयटीआयमध्ये १० हजार रुपये वार्षिक प्रशिक्षण शुल्क आकारण्यात येणार आहे.शुल्कात भेदभाव न करण्याची विरोधकांची मागणीविषयावरील चर्चेत मंगला कदम यांनी शुल्कामध्ये भेदभाव करू नये, एकसारखे असावे, अशी भूमिका मांडली. त्यावर आशा शेंडगे यांनी तीनचा विषय मंजूर नसताना चार वर चर्चा कशी काय? असा प्रश्न उपस्थित केला. या चर्चेत स्थायी समिती सभापती सीमा सावळे, पक्षनेते एकनाथ पवार, विरोधी पक्षनेते योगेश बहल, सचिन चिखले यांनी सहभाग घेतला. विरोधी पक्षाची उपसूचना विचारात न घेता मूळ विषय मंजूर केला.

 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडStudentविद्यार्थी