शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

जे विश्वासघात करत नाहीत त्यांना पुरस्कार दिले जातात: नीलम गोऱ्हे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2022 08:28 IST

जे विश्वासघात करत नाहीत त्यांना पुरस्कार दिले जातात. आज ज्यांना पुरस्कार मिळाला आहे.

पिंपरी : 

जे विश्वासघात करत नाहीत त्यांना पुरस्कार दिले जातात. आज ज्यांना पुरस्कार मिळाला आहे. त्यांनी सामान्य माणसांची विश्वासर्हता कमावली आहे. त्यामुळे ते उध्दवश्री पुरस्कार प्राप्त ठरले आहेत, असे प्रतिपादन उपसभापती नीलम गो-हे यांनी चिंचवड येथे केले.

उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त गेली २२ वर्षे उध्दवश्री पुरस्कार दिला जातो. त्याचे वितरण झाले. त्याप्रसंगी नीलम गो-हे बोलत होत्या. यावेळी शिवसेनेचे पुणे जिल्हा संपर्कप्रमुख सचीन अहिर, माजी आमदार गौतम चाबुकस्वार, वैभव थोरात, पिंपरी-चिंचवड शहरप्रमुख सचिन भोसले, अनिकेत घुले आदी उपस्थित होते.

नीलम गोऱ्हे म्हणाल्या, उद्धवश्री पुरस्कार वितरण करणा-या संयोजकांचे कौतुक आहे. तसेच पिंपरी-चिंचवडची गुणवंतनगरी म्हणून नवी ओळख होत आहे. कामाची पावती म्हणजे पुरस्कार असतात. त्यातून इतरांची आपल्यावर असलेली विश्वासर्हता आजमावता येते. शिवसेना म्हणजे ८० टक्के समाजकारण, २० टक्के राजकारण आहे. तेच आम्ही करणार, आगामी निवडणुकांच्या कालावधीतही आपण एकजूट राहून शिवसैनिक विजयाचा धनुष्यबाण खेचून आणणार आहे.

सचिन अहिर म्हणाले, पक्षनिष्ठा कार्यकर्त्याना शिकवावी लागत नाही. कार्यकर्ता समाजासाठी जगत असतो. त्याला कुटुंबासाठीही वेळ देता येत नाही. पक्षप्रमुखांच्या नावाने पुरस्कार देणे हे खूप कमी ठिकाणी पाहायला मिळते. संयमाचे प्रतीक म्हणजे हा पुरस्कार आहे. नीलम गोऱ्हेचे कौतुकास्पद काम, राजकीय पटलावरील भूमिका बजावण्याची उल्लेखनीय काम नीलम गो-हे यांनी केले आहे. तसेच काम इतर राजकीय नेत्यांनी करण्याची नागरिकांची अपेक्षा असते.

संस्थेच्या २५व्या वर्धापणदिनी उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होतील अथवा केंद्रात असतील, अशी अपेक्षा अहीर यांनी व्यक्त केली. पक्ष संकटात असताना असे उपक्रम राबविणे कौतुकास्पद असल्याचेही त्यांनी सांगितले.

बाळासाहेबांचे आपण सर्वच मानसपुत्रयोगगुरू रामदेवबाबा मुंबईत आले असता बाळासाहेब ठाकरेचे खरे मानसपुत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत, असे म्हटले आहे. त्यावर बोलतांना गो-हे म्हणाल्या, सगळी शिवसेनाचं बाळासाहेब ठाकरेंची मानसपुत्र आहे. बाळासाहेब मतभेद असणारांनाही प्रेमाची वागणूक द्यायचे. त्यामुळे त्यांचा मानसपुत्र कोणी एक होवू शकत नाही, आपण सर्व त्यांचे मानसपुत्र आहोत.

टॅग्स :Neelam gorheनीलम गो-हेShiv Senaशिवसेना