शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

सोनसाखळी चोरटा जेरबंद : चोरीचे अकरा गुन्हे उघडकीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2018 02:08 IST

महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी चोरणारा चोरटा सोमवारी भोसरी एमआयडीसी पोलिसांच्या गळाला लागला. त्याच्याकडून तब्बल ६ लाख ४३ हजार ५०० रुपये किमतीचे १५९.५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.

पिंपरी : महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी चोरणारा चोरटा सोमवारी भोसरी एमआयडीसी पोलिसांच्या गळाला लागला. त्याच्याकडून तब्बल ६ लाख ४३ हजार ५०० रुपये किमतीचे १५९.५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. या कारवाईमुळे एकूण ११ गुन्हे उघडकीस आले आहेत. सचिन तुकाराम राजगुरू (वय २७, रा. इंद्रायणीनगर, भोसरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.सहायक पोलीस आयुक्त सतीश पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी ५ जुलैला एक महिला रस्त्याने पायी जात असताना दुचाकीवरून आलेल्या चोरट्याने तिच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावली. याप्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. त्या गुन्ह्याची उकल करण्यासाठी भोसरी एमआयडीसी पोलिसांनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत तपास पथके तैनात केली. तपासपथकांनी सापळा रचून सचिन याला पकडले. त्याच्याकडे कसून चौकशी केली असता, त्याने सहा सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यांची कबुली दिली. यामुळे भोसरी एमआयडीसी, चाकण आणि निगडी पोलीस ठाण्यातील ११ गुन्हे उघडकीस आले आहेत.सचिन वेल्डिंगचे काम करीत होता. त्याचे लग्नानंतर चाकण येथील एका महिलेसोबत प्रेमसंबंध होते. तो कामावर गैरहजर राहू लागला.त्याला कामावरून कमी केले. त्यामुळे त्याची पत्नी त्याला त्याला सोडून गेली. पर्यायाने तो चाकण येथील महिलेकडे जाऊ लागला. नोकरी गेल्याने खर्चाला पैसे कमी पडू लागले. त्यामुळे त्याने चोरीचा मार्ग निवडला आणि तो पोलिसांच्या जाळ्यात अडकला.दरम्यान, पिंपरी-चिंचवड शहरात सोनसाखळी चोरीच्या अनेक घटना घडल्या आहेत. गर्दीच्या ठिकाणी तसेच निर्जनस्थळी चोरटे सोनसाखळ्यांवर डल्ला मारतात. या घटनांमध्ये अनेकदा महिला जखमीही होतात. या घटना रोखण्यासाठी कडक उपाययोजना करण्याची गरज आहे.

टॅग्स :Crimeगुन्हाpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड