शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
2
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
3
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
4
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
5
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
6
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
7
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
8
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
9
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
10
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
11
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
12
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
13
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
14
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
15
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
16
राहुल गांधींमुळे काँग्रेसच्या तरुण खासदारांचे भविष्य धोक्यात; PM मोदींचा घणाघात...
17
लालूप्रसाद यादवांना निकामी किडनी दिली; तेजस्वी यादव अन् बहीण रोहिणी आचार्य यांच्यात तू तू मै मै, चप्पलफेक...
18
ICC WTC Points Table : टीम इंडियापेक्षा लंका भारी! दक्षिण आफ्रिकेची दुसऱ्या स्थानावर झेप
19
सावधान! डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करताय? 'या' ३ मोठ्या जोखमींमुळे पैसे बुडण्याची शक्यता
20
प्रेमासाठी ओलांडल्या देशासह धर्माच्या सीमा; पाकिस्तानी तरुणावर जडला भारतीय महिलेचा जीव
Daily Top 2Weekly Top 5

थेरगावातील खड्डे बुजविले, वाहनचालकांना मिळाला दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2018 01:27 IST

महापालिका : डांगे चौक ते काळेवाडी फाटा मुख्य मार्गावरील रस्त्यांसह अनेक भागातील अंतर्गत रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली होती. त्यामुळे रस्त्यात खड्डे की खड्ड्यांत रस्ते,

थेरगाव : डांगे चौक ते काळेवाडी फाटा मुख्य मार्गावरील रस्त्यांसह अनेक भागातील अंतर्गत रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली होती. त्यामुळे रस्त्यात खड्डे की खड्ड्यांत रस्ते, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित करण्यात येत आहे. पावसामुळे रस्त्यांची चाळण झाली असल्याने अपघाताचा धोका वाढला होता. याबाबत ‘लोकमत’ने सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले. त्याची दखल घेत पालिकेने डांबर टाकून येथील खड्डे बुजविले.

वाकड येथील १६ नंबर ते काळेवाडी फाटा या १०० मीटरच्या अंतरात रस्त्यावर ४० ते ५० मोठे खड्डे होते. त्यामुळे वाहनचालकांनायेथे कसरत करावी लागत होती. कावेरीनगर येथील भुयारी मार्गासमोरच रस्ता उखडून मोठे खड्डे झाले होते. भुयारी मार्गातून थेट खड्ड्यांत वाहने जात होती. या खड्ड्यांत पावसाचे पाणी साचते. त्यामुळे वाहनचालकांना या खड्ड्यांचा अंदाज येत नव्हता. त्यामुळे अनेक अपघात झाले होते. लहान-मोठ्या खड्ड्यांमधील खडी बाहेर येऊन त्या जागेवर सतत वाहनांची आदळआपट सुरू असल्याने खड््ड्यांचा आकार वाढतच होता.मार्च ते मे या कालावधीत डांबरीकरण, डागडुजी केलेल्या रस्त्यांवरील खडी पावसाच्या पाण्यामुळे उखडली होती. गेल्या महिन्यात खड्डे तात्पुरते बुजविण्यात आले होते. मात्र गेल्या आठवड्यात पावसाने पुन्हा खडी उखडून खड्डे झाले. डांगे चौक ते काळेवाडी फाटा या मार्गावर अनेक ठिकाणी रस्ता उंच तर काही ठिकाणी सखल झाला आहे. तसेच अनेक ठिकाणी चेंबरची समपातळी नसल्याने या भागात वारंवार अपघात होत असतात. त्यामुळे या रस्त्यावरची वाढती वाहतूक लक्षात घेता प्रशासनाने रस्त्यावरच्या रहदारीचा जीव मुठीत घेऊन होणारा प्रवास सुखकारक होण्यासाठी वारंवार तात्पुरती मलमपट्टी न करता कायमच्या उपाययोजनेची मागणी होत आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPuneपुणे