शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
4
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
5
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
6
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
7
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
8
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
9
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
10
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
11
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
12
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
13
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
14
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
15
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
16
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
17
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
18
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
19
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
20
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?

आली लगीन घटिका, कार्यालयासाठी धावपळ

By admin | Updated: November 23, 2014 00:23 IST

तुलसी विवाहानंतर मंगल कार्यालये बुक करण्यासाठी वधू-वरांच्या कुटुंबियांची धावपळ सुरू झाली आहे. 26 नोव्हेंबर पासून विवाहाचे मुहूर्त सुरू होत आहेत.

सुवर्णा नवले - पिंपरी
तुलसी विवाहानंतर  मंगल कार्यालये बुक करण्यासाठी वधू-वरांच्या कुटुंबियांची धावपळ सुरू झाली आहे. 26 नोव्हेंबर पासून विवाहाचे मुहूर्त सुरू होत आहेत.
काही प्रतिष्ठीत किंवा पैशावाल्या मंडळीचा शहरातील नामवंत कार्यालये बुक करण्याकडे  कल असतो. लग्न  थाटामाटातच करण्याचा काही कुटुंबाचा प्रयत्न असतो. त्यामुळे मंगल कार्यालयाच्या भाडय़ाचा ते विचार न करता बुकींग करुन टाकतात. मात्र, सर्वसामान्य आवाक्यातील कार्यालयाचा शोध घेत बुकींग करीत आहेत.
अगदी छोटय़ा हॉलपासून ते मोठमोठय़ा कार्यालये  आणि लॉन्सना  मागणी वाढली आहे.  पिंपरी,  चिंचवड, भोसरी या महत्त्वाच्या ठिकाणी   कार्यालये  नोंदणी करण्यासाठी मोठय़ा प्रमाणात विचारणा होत आहे. चिंचवड परिसरात सर्वात जास्त मंगल कार्यालये आहेत.  रावेत, वाकड, ताथवडे, हिंजवडी, पिंपळे निलख, पिंपळे सौदागर, रहाटणी, दापोडी, काळेवाडी  , चिखली, थेरगांव,  आदी ठिकाणीही अनेक कार्यालये आहेत. बहुतेक  कार्यालयांची  नोंदणी जोरात सुरु आहे. ठराविक कार्यालयात तारखा शिल्लक नसल्याचेही सांगण्यात येत आहे. 
रावेत, वाकड, भोसरी, थेरगांव, चिंचवड, निगडी परिसरातील कार्यालयाचे बुकीग करण्यात येत आहे. देहू व आळंदी  या तीर्थक्षेत्री मोठय़ा प्रमाणावर विवाह केले जात आहेत. तेथील धर्मशाळा किंवा कार्यालय  दिवसात दोन विवाहासाठी  आरक्षित केले जात आहे. सकाळी व संध्याकाळच्या मुहूर्तासाठी  नोंदणी   करण्यात आली आहे. सर्वसामान्यांना देहू व आळंदीत विवाह करणो सोईस्कर वाटते. अनेक मध्यमवर्गीय कुटुंबे तिकडेच धाव घेतात. काही धर्मशाळा, कार्यालयांचे भाडे 1क् ते 12 हजार रुपये इतके सामान्यांना  परवडणारे आहे. शिवाय तेथे विवाहासाठीची सर्व तयारी करून मिळते.  सामूहिक विवाहातही वाढ झाली आहे. आळंदी व देहू तसेच शहरातील काही संस्था, सामाजिक कार्यकर्ते सामू¨ंहक विवाहासाठी पुढाकार घेतात.
 
4लग्नसराई सुरू झाली आहे. शहरातील लग्न कार्यालयांची आगाऊ नोंदणी वधू व वरांच्या कुटुंबियांनी सुरू केली आहे. यामुळे लग्नाच्या 3 महिन्याच्या हंगामात कार्यालयाना चांगलाच वाव मिळतो.
4हा तीन महिन्याच्या हंगाम कार्यालय मालकांसाठी सुगीचा असतो. यामुळे लग्नाची कार्यालयाच्या तिथी वाया जाऊ नयेत याची ते काळजी घेतात. 
 
कार्यालये करण्यासाठी नोव्हेंबरमध्ये गर्दी वाढू लागली आहे. लग्नाचे मुहूर्तही मोठय़ा प्रमाणावर आहेत. यामुळे आतापासूनच आगाऊ नोंदणी करण्यासाठी नागरिक येत आहेत. 
किशोर निंबाळकर, कार्यालय मालक, ताथवडे
आतार्पयत कार्यालयाचे 12 ते 15 बुकींग झाले आहेत. अजून मोठय़ा प्रमाणावर बुकींग होण्याची अपेक्षा आहे. मात्र लग्नसराई सुरू झाल्यामुळे आता कार्यालयांना मागणी वाढली आहे. 
- बाळासाहेब बेंद्रे, कार्यालय मालक, हिंजवडी
 
 
4डिसेंबरमधील मुहूर्त
दि. 2क् : सायं. 5.29.
दि. 23 : सायं. 4:3क्.
दि. 24 : सायं. 4:3क्.
दि. 26 : सायं. 6:17.
दि. 28 : दुपारी 3:24
दि. 29 : सायं 6:17.
4जानेवारीतील मुहूर्त
दि. क्2 : सायं. 4:49, 7:45.
दि. क्4 : सायं. 3:5क्.
दि. क्9 : सायं. 5:45, 7:45.
दि. 1क् : दुपारी 3:27, 5:41.
4फेब्रुवारीमधील मुहूर्त
दि. 1 : सायं. 4:2क्, 6:56.
दि. 3 : सायं. 5:37.
दि. 7 : सायं. 5:3क्.
दि. 12 : सायं. 6:13.
दि. 15 : सायं. 4:51.
दि. 17 : सायं. 5:53.
दि. 18 : सायं. 4:53, 7:3क्.
दि. 24 : सायं. 4.57.
दि. 26 : सायं. 4.57.