शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
3
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
4
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
5
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
6
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
7
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
8
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
9
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
10
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
11
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
12
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
13
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
14
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
15
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
16
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
17
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
18
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट
19
अरे बापरे! डोक सटकलं आणि गेम झोनच्या कर्मचाऱ्याचे नाक युवकाने हातोड्याने फोडले
20
११ कोटींची लॉटरी जिंकणारा 'तो' व्यक्ती अखेर सापडला! रस्त्यावर विकत होता कांदे-बटाटे अन्...

यंदा नव्या घोषणा नाहीत; पिंपरी चिंचवड महापालिकेचे बजेट सादर; आराखडा ८ हजार कोटींचा

By विश्वास मोरे | Updated: February 20, 2024 11:30 IST

पायाभूत सुविधा, पाणीपुरवठा आणि वाहतूक या घटकांवर प्राधान्याने लक्ष केंद्रित करतानाच त्यासाठी निधी राखून ठेवण्यात आला आहे

पिंपरी :  मालमत्ताकर, पाणीपट्टी यांत कोणतीही करवाढ - दरवाढ नसलेला सन २०२४ - २५ या आगामी आर्थिक वर्षाचा ५  हजार ८४२ कोटी रुपयांचा मूळ तर केंद्र सरकार पुरस्कृत योजनांसह ८ हजार ६७६ कोटी रुपयांचा प्रारुप अर्थसंकल्प महापालिका मुख्य लेखा व वित्त अधिकारी प्रवीण जैन यांनी मंगळवारी  प्रशासक शेखर सिंह यांना सादर केला. या अर्थसंकल्पात जुन्याच योजनांना मुलामा लावला  आहे. ११४९ कोटी ५९  लाख रुपये शिलकीच्या या अर्थसंकल्पात जुन्या योजनांच्या सक्षमीकरणावर भर दिला आहे. केंद्र - राज्य सरकारच्या अनुदानावर महापालिकेचा डोलारा उभा आहे. उत्पन्न वाढीवर भर दिला आहे.

पिंपरी - चिंचवड महापालिकेत गेले दोन वर्ष प्रशासकीय राजवट सुरु आहे. त्यामुळे लोकनियुक्त समिती नाही. त्यामुळे आज सकाळी ११ ला सभा सुरू झाली. मुख्य लेखाधिकारी  प्रवीण जैन यांनी प्रशासक शेखर सिंह यांच्याकडे अर्थसंकल्प सादर केला. यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, उल्हास जगताप,  महापालिकेचा हा ४२ वा अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पाच्या प्रशासक शेखर सिंह यांनी तत्काळ मान्यता दिली. त्यामुळे १ एप्रिल २०२४ पासून विनासायास या अर्थसंकल्पाची अंमलबजावणी सुरु होणार आहे. 'इलेक्शन इअर' असल्याने या अर्थसंकल्पाद्वारे पिंपरी - चिंचवडकरांवर करवाढीचा बोझा टाळला आहे. अपवाद वगळता नव्या घोषणा केलेल्या नाहीत. महापालिकेचे उत्पन्न कसे वाढणार याबाबत यावर अर्थसंकल्पात  'रोड मॅप' महापालिकेने आखला आहे. मालमत्ताकर, जीएसटी आणि बांधकाम विकास शुल्क हे पारंपरिक आर्थिक स्त्रोत सक्षम करुन त्यातून उत्पन्न वाढेल अशी अपेक्षा व्यक्त केली.

पायभूत सुविधा आणि पुल, मेट्रो

 पायाभूत सुविधा, पाणीपुरवठा आणि वाहतूक या घटकांवर प्राधान्याने लक्ष केंद्रित करतानाच त्यासाठी निधी राखून ठेवण्यात आला आहे. सुरू असलेले पाणीपुरवठा, सांडपाणी प्रकल्प आणि उड्डाणपूल पूर्ण करण्यावर अर्थसंकल्पात भर देण्यात आला मोशी हॉस्पिटल, पिंपरी डेअरी फार्म पुल, सांगवी पूल आणि प्रशासकीय इमारत, निगडी पर्यंत मेट्रो, हरित सेतू, सिटी सेंटर, मोशी स्टेडियम वगळता असल्यामुळे कोणतेही नवे प्रकल्प  सुचविलेले नाहीत. पीपीपी तत्त्वावर प्राध्यान्य दिले जाणार आहे. 

अर्थसंकल्पाची वैशिष्ट्ये !

१) विविध विकास कामांसाठी १८३३ कोटी ४८ लाख२) शहरी गरिबांसाठी १८९८ कोटी  ३) क्षेत्रीय स्तरावरील विकास कामांसाठी २००कोटी ५४ लाख४) पाणी पुरवठा विशेष निधी २६९ कोटी५) अमृत योजना तरतूद ३० कोटी ३८६) स्वच्छ भारत मिशनसाठी ००० कोटी७) स्मार्ट सिटी तरतूद ५० कोटी८) दिव्यांग कल्याणकारी योजनेसाठी ६५ कोटी २१९) अतिक्रमण निर्मूलन व्यवस्थेकरिता १० कोटी१०) भूसंपादन तरतूद १०० कोटी११) अतिक्रमण निर्मूलन १० कोटी.१२) मेट्रोसाठी ५० कोटी.

टॅग्स :PuneपुणेMuncipal Corporationनगर पालिकाBudgetअर्थसंकल्प 2024MONEYपैसाGovernmentसरकार