शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

पुन्हा ‘तीन पैशांचा तमाशा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2018 03:02 IST

महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व असलेल्या पु. ल. देशपांडे यांच्या सिद्धहस्त लेखणीतून साकारलेले अजरामर नाटक म्हणजे ‘तीन पैशाचा तमाशा’ हे नाटक रंगमंचावर सादर करण्याचे स्वप्न अनेक कलाकारांनी उराशी बाळगले...

पुणे  - महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व असलेल्या पु. ल. देशपांडे यांच्या सिद्धहस्त लेखणीतून साकारलेले अजरामर नाटक म्हणजे ‘तीन पैशाचा तमाशा’ हे नाटक रंगमंचावर सादर करण्याचे स्वप्न अनेक कलाकारांनी उराशी बाळगले...त्यातील काही जणांना प्रत्यक्षात ते रंगमंचावर साकारण्याची संधीही मिळाली...पण आता हे नाटक पुन्हा रंगमंचावर साकार होत आहे, ते काही दिव्यांग कलाकारांच्या अभिनयातून. तब्बल २२ कलाकार हे नाटक घेऊन रसिकांच्या भेटीला येत आहेत. सध्या या नाटकाच्या रंगीत तालमी सुरू असून, लवकरच ते रसिकांच्या सेवेत दाखल होणार आहे.पुलंचा मंगळवारी (दि. १२) स्मृतिदिन. येत्या नोव्हेंबरमध्ये पुलंचे जन्मशताब्दीवर्षही सुरू होत आहे. याचे औचित्य साधून रश्मी पांढरे आणि वीणा ढोले यांच्या आरलीन संस्थेने ‘तीन पैशाचा तमाशा’ हे नाटक पुन्हा रंगभूमीवर आणत आहेत.पु. लं.नी विसाव्या शतकातला श्रेष्ठ जर्मन नाटककार, दिग्दर्शक, संगीतज्ञ, कवी आणि तत्त्वचिंतक बटरेल्ट ब्रेश्ट याच्या ‘द थ्री पेनी आॅपेरा’ या मूळ जर्मन नाटकाचं केलेलं स्वैर रूपांतर म्हणजे ‘तीन पैशांचा तमाशा’ हे नाटक. अगदी गण-गवळणपासून ते तमाशापर्यंतच्या लोककलांचा स्पर्श करीत पुलंनी हे नाटक रंगमंचावर आणले. पुलंनंतर थिएटर अ‍ॅकॅडमीने पुलंच्या ‘तीन पैशाचा तमाशा’ नाटकाचा पहिला प्रयोग २५ जून १९७८ रोजी पुण्यातील टिळक स्मारक मंदिर येथे केला होता. डॉ. जब्बार पटेल यांनी या नाटकाचे दिग्दर्शन केले होते. त्यानंतर २००० मध्ये स्वागत थोरात यांनी ‘यशोगाथा’ संस्थेतर्फे हे नाटक रंगमंचावर आणले होते. त्यामध्ये ४४ दृष्टिहीन कलाकारांनी काम केले होते. आता ‘तीन पैशाचा तमाशा’ तिसऱ्यांदा रंगमंचावर सादर होणार असून यामध्येही दृष्टिहीन कलाकारांचा सहभाग आहे.नाटकाच्या तालमीमध्ये गौरव घायले, अद्वैत मराठे, विकी शेट्टी, सुंदर सोंडस, प्रवीण पाखरे, सौरभ चौगुले, प्रवीण पालके, संतोष कसबे, राम भोईटे, फईम तांबोळी, स्वप्नील पाटील, रामकृष्ण घुले, रूपाली यादव, तेजस्विनी भालेकर, मेघा पाटील, आरती ढगे, शीतल चव्हाण, बेला सोंडे, प्राजक्ता डफळ, हेमांगी धामणे असे दृष्टिहीन कलाकार सहभागी झाले आहेत. तांत्रिक बाजू सचिन ठाकूर, प्रशांत कांबळे, ऋचा पाटील, वृषाली बोरावके हे सांभाळत असून, वनिता देशपांडे कार्यकारी निर्मात्या म्हणून काम करत आहेत.स्वागत थोरातांवर दिग्दर्शनाची जबाबदारीरश्मी पांढरे आणि वीणा ढोले यांच्या आरलीन संस्थेला त्यासाठी त्यांना ‘साबी फाउंडेशन’ या संस्थेचे सहकार्य लाभले आहे. या निर्मात्याद्वयींनी यापूर्वी गणेश दिघे यांच्या ‘अपूर्व मेघदूत’ या १९ दृष्टिहीन कलाकारांच्या भूमिका असलेल्या नाटकाची निर्मिती केली होती. ‘अपूर्व मेघदूत’चे दिग्दर्शन करणारे स्वागत थोरात यांनी ‘तीन पैशाचा तमाशा’ नाटकाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी स्वीकारली आहे.नाटकामध्ये बारा गाणीया नाटकामध्ये बारा गाणी असून बिपीन वर्तक यांनी संगीत दिले आहे. अरविंद हसबनीस यांनी संगीत संयोजन केले आहे. राधा मंगेशकर, शरयू दाते, शंतनू हेर्लेकर, बिपीन वर्तक आणि अरविंद हसबनीस यांच्या आवाजात ही गीते स्वरबद्ध करण्यात आली आहेत. २४ जून रोजी या नाटकातील गाण्यांच्या सीडीचे प्रकाशन होणार असल्याची माहिती रश्मी पांढरे यांनी दिली.

टॅग्स :Puneपुणेentertainmentकरमणूक