शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
2
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
3
उल्हासनगरला पावसाने झोडापले, नाल्यावरील पूल कोसळला 
4
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
5
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
6
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
7
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
8
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
9
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
10
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
11
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
12
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
13
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
14
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
15
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
16
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
17
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
18
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
19
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
20
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू

Pimpri Chinchwad: पिंपरी गावातील मंडळाच्या मिरवणुकीत ढोल पथकांचा दणदणाट 

By नारायण बडगुजर | Updated: September 28, 2023 13:30 IST

घाटांवर वैद्यकीय पथक तैनात...

पिंपरी : लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी पिंपरी गावात दुपारी बारा नंतर मिरवणुकांना सुरुवात झाली. नवसाचा महागणपती असलेल्या मित्र सहकार्य तरुण मंडळाने लक्ष वेधून घेतले. मंडळाने साकारलेली विठ्ठलाची भव्य मूर्ती आणि ढोलपथक आकर्षण आहे. तसेच दुपारी एक पर्यंत घरगुती गणेश भक्त मोठ्या संख्येने घराबाहेर पडले.

पिंपरी येथे सुभाष नगर येथील झुलेलाल घाट आणि पिंपरी गावातील घाट येथे महापालिकेतर्फे विसर्जन हौदाची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच पिंपरी गावात माजी नगरसेवक संदीप वाघेरे यांनी देखील विसर्जनासाठी दोन हौद तयार केले आहेत. त्याचप्रमाणे वैभवनगर येथे देखील विसर्जन हौद उपलब्ध करून देण्यात आले आहेत. 

पवना नदीवरील घाटावर घरगुती गणपतीच्या मूर्तींचे दुपारी एक वाजता पर्यंत विसर्जन करण्यात आले. तसेच महापालिकेच्या पिंपरी गावातील घाटावर दुपारी एक पर्यंत वीस मूर्तीचे विसर्जन करण्यात आले. महापालिकेतर्फे घाटांवर जीव रक्षक व सुरक्षारक्षकांची नियुक्ती करण्यात आले आहे. नदीपात्रात विसर्जनास मनाई केल्याने सर्व मूर्तींचे हौदामध्ये विसर्जन केले जात आहे. 

घरगुती बाप्पाला निरोप देताना अबालवृद्धांकडून गणरायाचा जयघोष केला जात आहे. मंगलमूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या, असे म्हणत आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला जात आहे. 

घाटांवर वैद्यकीय पथक तैनातविसर्जन घाटांवर महापालिकेकडून वैद्यकीय पथक नियुक्त केले आहे. तसेच रुग्णवाहिका दिली आहे. घाटावरील कर्मचारी व गणेश भक्त यांची आवश्यकतेनुसार उच्च रक्तदाब तपासणी, मधुमेह तपासणी करून घेण्यात येत आहे. तसेच प्रथमोपचार सुविधा देखील उपलब्ध आहे. 

शगुन चौकात स्वागत कक्षमहापालिकेकडून पिंपरीतील शगुन चौकात स्वागत कक्ष उभारण्यात आला आहे. येथे मंडळाचे स्वागत केले जाणार आहे. त्याचप्रमाणे पोलिसांकडून टेहळणी मनोरे देखील उभारले आहेत.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड