शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

Pimpari-Chinchwad Muncipal Corporation: सर्वाधिक लहान प्रभाग ३७ हजार तर सर्वांत मोठा प्रभाग तळवडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2022 11:02 IST

महापालिका निवडणूकीची रणधुमाळी सुरू झाली असून प्रारुप प्रभाग रचनेचा आराखडा मंगळवारी सकाळी जाहीर होणार आहे

विश्वास मोरे

पिंपरी : महापालिका निवडणूकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. प्रारुप प्रभाग रचनेचा आराखडा मंगळवारी सकाळी जाहीर होणार आहे. तर १३९ प्रभागात २२ प्रभाग अनुसुचित जातीसाठी आणि ३ प्रभाग अनुसुचित जमातींसाठी आणि ११४ जागा खुल्या गटांसाठी असणार आहे. तीन सदस्यांत सर्वांत मोठा प्रभाग तळवडे असेल तर चार सदस्यांत सर्वांत मोठा प्रभाग हा सांगवी असणार आहे. तळवडे येथून प्रभागाला सुरुवात होणार असून शेवटचा प्रभाग हा सांगवी असणार असल्याचे समजते.

पिंपरी - चिंचवड महापालिकेची सार्वत्रिक निवडणुक फेब्रुवारीत होणार होती. मात्र, प्रारूप आराखडयासाठी चारवेळा मुदतवाढ देण्यात आली. तो आराखडा तयार करण्यात आला. २०१७ च्या निवडणूकीत १२८ प्रभाग होते. लोकसंख्येच्या तुलनेत महापालिकेच्या नगरसेवक संख्येत ११ ने वाढत ती १३९ झाली आहे. मंगळवारी प्रभाग रचनेचा आराखडा जाहिर होणार असल्याने  विद्यमान नगरसेवकांसह इच्छुकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. कोणाचा प्रभाग कसा झाला, याबाबत उत्सुकता आहे. नवा प्रभाग कसा असेल, त्याला कोणता भाग जोडला आणि कोणाचा प्रभाग तोडला याबाबत सुरस कथा दोन महिने सुरू होत्या. त्यास पूर्णविराम मिळणार आहे.

 पिंपरी-चिंचवड महापालिकेची सन २०१७ मधील निवडणूक ३२ प्रभाग हे चार नगरसेवकांचे ह७ोते. तर २०२२ मधील महापालिका निवडणूक तीनसदस्यीय पद्धतीने होणार असून त्यात ४६ प्रभाग आहेत. महापालिकेतील त्यातील ४५ प्रभाग तीन नगरेसवकांचे तर एक प्रभाग चार नगरसेवकांचा असेल. प्रभागाचा कच्चा आराखडा तयार करताना प्रगणक गट, प्रभाग दर्शविणाºया खुणा निश्चित केल्या जाणार आहेत. राज्य निवडणूक आयोगाला आराखडा सादर केल्यानंतर त्यात वारंवार बदल करण्यात आले.

असे असतील संख्याबळ

अनुक्रमांक, आरक्षण,  संख्या१) अनुसूचित जाती : २२२) अनुसूचित जमाती : ३३) खुला : ११४ एकूण : १३९ ...........................असे असते आरक्षण

आरक्षण, टक्केवारी१) अनुसूचित जाती : १६ टक्के२) अनुसूचित जमाती : ३ टक्के३) खुला : ११४ ....................१) लोकसंख्या (२०११) : १७ लाख २७ हजार ६९२२) अनुसूचित जातीची लोकसंख्या : २ लाख ७३ हजार ८१० (१५.८४ टक्के)३) अनुसूचित जमातीची लोकसंख्या : ३६ हजार ५३५ (२.११ टक्के)

अनुसुचित जातीसाठी २२ प्रभाग

स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अनुसूचित जातींसाठी १६ टक्के आरक्षण आहे. त्यामुळे १३९ सदस्यांमध्ये २२ सदस्य असतील. त्यात महिला व पुरुष सदस्यांची संख्या प्रत्येकी ११ आहेत. अनुसूचित जमातीसाठी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये तीन टक्के आरक्षण आहे. त्यानुसार सध्यस्थितीत अनुसूचित जमातीतील सदस्य संख्या तीनच राहणार आहे.

हे आहेत अनुसूचित जातींसाठी राखीव प्रभाग :

२९,१९,२०,२२,४३,११,३७,१८,२९,३४,१६,३५,१७,४४,३९,३२,४६,४१,१४,२५,३८,३३ हे २२ प्रभाग  आहेत.

हे आहेत अनुसूचित जमातीसाठी प्रभाग-

स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये तीन टक्के आरक्षण आहे. त्यानुसार सध्यस्थितीत अनुसूचित जमातीतील सदस्य संख्या तीनच राहणार आहे. त्यांच्यासाठी प्रभाग ४१, ५ आणि ६ हे आरक्षित असतील. ते दिघी, भोसरी आणि पिंपळे - गुरव, पिंपरी असे असण्याची शक्यता आहे.लहान प्रभाग ३२ चा तर मोठा ४० हजार लोकसंख्येचा  

प्रारूप आराखड्यात प्रभागाची कमी लोकसंख्या ३२ हजार तर अधिक लोकसंख्या ४० हजार अशी आहे. सर्वात कमी लोकसंख्या प्रभाग क्रमांक ३७ ची असून ती ३२ हजार ६६४ अशी आहे. तर सर्वाधिक लोकसंख्या तळवडे प्रभाग क्रमांक एकची असून ती ४० हजार ७६७ अशी आहे. तसेच, चार सदस्यीय प्रभाग असलेल्या सांगवीतील लोकसंख्या ४६ हजार ९७९ अशी आहे. 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMuncipal Corporationनगर पालिकाElectionनिवडणूकElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग