शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

तळेगावात दहा कोटींचे व्यापारी संकुल

By admin | Updated: November 26, 2015 00:47 IST

नगर परिषदेच्या वतीने १० कोटी ५८ लाख ८६ हजार रुपये खर्चाचे आणि ३८ हजार चौरस फुटांचे व्यापारी संकुल शासनाच्या योजनेतून उभारण्यात येणार आहे

तळेगाव दाभाडे : नगर परिषदेच्या वतीने १० कोटी ५८ लाख ८६ हजार रुपये खर्चाचे आणि ३८ हजार चौरस फुटांचे व्यापारी संकुल शासनाच्या योजनेतून उभारण्यात येणार आहे. तसा प्रस्ताव शासनाकडे मंजुरीसाठी सादर केला आहे. मात्र, शासनाकडून निधी प्राप्त होईपर्यंत वाट न पाहता व्यापारी संकुलाचे काम नगर परिषदेकडून स्वबळावर सुरू करण्यात येईल, अशी माहिती गटनेते बापू भेगडे यांनी दिली.व्यापारी संकुलाचे भूमिपूजन लवकरच होणार असल्याचे नगराध्यक्षा माया भेगडे आणि मुख्याधिकारी कैलास गावडे यांनी सांगितले. संकुलाच्या तीन इमारतीत एकूण ४८ दुकाने आणि ३० कार्यालये प्रस्तावित आहेत.नगर परिषदेच्या थोर समाजसेवक नथुभाऊ भेगडे पाटील शाळेच्या आवारात ३ कोटी ७१ लाख ४१ हजार ८५० रुपये खर्चाच्या क्रीडा संकुलास शासनाने मंजुरी दिली आहे. नियोजित क्रीडा संकुलात बहुउद्देशीय सेवेसाठी सभागृह, व्यायामशाळा, वाहनतळ, बॅडमिंटन हॉल, इनडोअर कुस्ती केंद्र आणि दीडशे क्षमतेचे प्रेक्षागृह उभारण्यात येणार असल्याचे नगराध्यक्षा भेगडे यांनी सांगितले.नगर परिषदेच्या स्थायी समितीच्या विशेष सभेत एकूण ४२ विषयांना मंजुरी देण्यात आली. मंजूर कामे लवकरात लवकर मार्गी लावण्यात येणार असल्याचे नगराध्यक्षा भेगडे यांनी सांगितले.त्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेस पक्षप्रतोद बापू भेगडे, नगरसेवक गणेश काकडे, माजी नगराध्यक्ष सुरेश धोत्रे, नगरसेविका रंजना भोसले, शालिनी खळदे, सुनंदा मखामले आणि मुख्याधिकारी कैलास गावडे उपस्थित होते. शहरातील पाणीपुरवठा पुरेसा आणि नियमित करण्यासाठी सोमाटणे पंप हाऊसच्या जॅकवेल आणि ट्रान्सफॉर्मरची दुरुस्ती करण्यास मंजुरी देण्यात आली. शहरातील बंदिस्त गटरांचे बांधकाम, सार्वजनिक स्वच्छतागृहांची दुरुस्ती, संत तुकारामनगर आणि राव कॉलनीतील अंतर्गत रस्त्यांवर पांढरे पट्टे मारणे, आवश्यक ठिकाणी स्पीडब्रेकर बसविणे, तसेच बॅलाडोर सोसायटीसह यशवंतनगर, मस्करनेस कॉलनी व उमंग सोसायटीत मिनी हायमास्ट बसविण्याच्या कामांना सभेने मंजुरी दिली. हुंडेकरी, विद्याविहार, मनोहरनगर, म्हाडा, सत्यकमल कॉलनीतील आरक्षित जागेवर खेळणी बसविण्याबाबतही निर्णय घेण्यात आला. नगरपालिकेतील कागदपत्रांचे डिजिटायझेशन करणे, तसेच संगणक संच बसविण्यास समिती सदस्यांनी मंजुरी दिली.(वार्ताहर)