शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
2
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
3
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
4
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
5
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!
6
३०, ४० आणि ५० व्या वर्षी 'कोट्यधीश' व्हायचेय? तुमच्या वयानुसार निवडा गुंतवणुकीची योग्य स्ट्रॅटेजी!
7
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
8
ICC Rankings : हातात विश्वचषकाचा 'दागिना'; पण जाता जाता लॉरानं 'वनडे क्वीन’ स्मृतीचा मुकूट हिसकावला!
9
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
10
सलग चौथ्या दिवशी बाजारात घसरण! गुंतवणूकदारांचे २.६ लाख कोटी पाण्यात; 'ही' आहेत ५ कारणे
11
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
12
मंदिराच्या गर्भगृहाची दुरुस्ती करताना सापडलं घबाड, कलशात होती सोन्याची एवढी नाणी...  
13
माणुसकीचा जमानाच राहीला नाही! ओला रायडरची मदत केली अन् तो तरुणीसोबत 'असा' वागला
14
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदेंना धक्का, रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेशी आघाडी
15
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
16
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
17
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
18
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
19
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
20
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?

पिंपरीसाठी पीएमपीचे दहा नवीन मार्ग , प्रशासनाचा निर्णय  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2018 04:46 IST

नववर्षानिमित्त पीएमपी प्रशासनातर्फे पुण्यातील प्रवाशांना अधिक प्रवासीकेंद्रित व सुरक्षित बससेवा उपलब्ध देण्यात येणार आहे. पीएमपीकडून जानेवारी महिन्यापासून नवीन १२ मार्गांवर बससेवा सुरू केली जाणार आहे.

पिंपरी : नववर्षानिमित्त पीएमपी प्रशासनातर्फे पुण्यातील प्रवाशांना अधिक प्रवासीकेंद्रित व सुरक्षित बससेवा उपलब्ध देण्यात येणार आहे. पीएमपीकडून जानेवारी महिन्यापासून नवीन १२ मार्गांवर बससेवा सुरू केली जाणार आहे. त्यात पिंपरीतील दहा मार्गांचा समावेश आहे. तसेच सध्या दररोज होणाºया बसच्या खेपांमध्ये ३ हजार खेपांनी वाढ होणार असल्याने प्रतिदिनी बस खेपांची संख्या २४ हजार ३०० पर्यंत वाढणार आहे. त्यामुळे प्रवाशांना बससेवेचा अधिक चांगल्या प्रकारे लाभ घेता येईल, असा विश्वास पीएमपीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांनी सांगितले.पीएमपी प्रशासनातर्फे प्रवाशांना अधिकाधिक चांगली सेवा देण्याचा प्रयत्न केला जात आहे. गेल्या आठ महिन्यांत प्रवासीसंख्या, मार्गांचे परीक्षण लोकप्रतिनिधी व सर्वसामान्य प्रवाशांच्या मागणीनुसार नवीन वर्षानिमित्त अधिक तत्पर सेवा देण्यासाठी काही उपाययोजना करण्यात आल्या आहेत, असे नमूद करून मुंढे म्हणाले, की पीएमपीच्या पूर्वीच्या १ हजार ४३६ शेड्यूलमध्ये आता ३७४ शेड्यूलने वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे या शेड्यूलची संख्या १ हजार ८१० झाली आहे. या शेड्यूलच्या माध्यमातून पीएमपी बसच्या दररोज २४ हजार ३०० फेºया होणार आहेत. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापासून १ हजार ६२० शेड्यूल प्रवाशांसाठी उपलब्ध होणार आहे, तर उर्वरित शेड्यूल जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून सुरू करण्यात येतील, असेही तुकाराम मुंढे म्हणाले.नवीन वर्षानिमित्त महिलांसाठी ३० विशेष बस उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत, असे नमूद करून मुंढे म्हणाले, ‘‘जास्तीत जास्त बस मार्गावर देऊन प्रवाशांना वेळेत बससेवा उपलब्ध करून देण्यासाठी ७६ अतिरिक्त शेड्यूलचे वेळापत्रक तयार करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे गर्दीच्या वेळी सकाळी ८ ते दुपारी १२ आणि सायंकाळी ४.३० पासून रात्री ८.३० पर्यंत जादा बस सोडल्या जाणार आहेत. ज्या भागात अद्याप एकही बस गेलेली नाही, अशी गावेनव्या शेड्यूलमध्ये घेण्यात आली आहेत.गर्दीच्या वेळी जादा फेºयापीएमपीच्या बसला सकाळी आणि संध्याकाळी मोठ्या प्रमाणवर गर्दी असते. या गर्दीच्या वेळेत नोकरदार, कामगार, विद्यार्थी यांना वेळेवर आणि चांगली प्रवासी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सकाळी ८ ते १२ आणि संध्याकाळी ४.३० ते ८.३० या वेळेत ७५ शेड्यूलच्या माध्यमातून बसच्या ६३६ जादा फेºया मारल्या जाणार आहेत. त्यात सकाळच्या सत्रात ३४०, तर सायंकाळच्या सत्रात २९६ फेºया मारल्या जाणार आहेत.मिडीबस लवकरच दाखल होणारपीएमपीच्या ताफ्यात पुढील काही दिवसांत २०० मिडीबस दाखल होणार आहेत. नवीन वर्षाच्या नियोजनामध्ये मिडीबसचे १०० शेड्यूल तयार करण्यात आले आहे. मिडीबस दाखल झाल्यानंतर पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांतर्गत या मार्गांवर बस चालविल्या जातील.जानेवारी महिन्यात सुरू केल्या जाणाºया १२ मार्गांपैकी ८ नवीन मार्ग याप्रमाणे :४स्वारगेट - वाघोली (पूलगेट, मगरपट्टा सिटी, खराडी बायपासमार्गे)४हडपसर - वाघोली (थेऊर, साष्टे,केसनंदमार्गे)४स्वारगेट - उंड्रीगाव (देसाई हॉस्पिटल, महंमदवाडीमार्गे)४वारजे माळवाडी - केशवनगर (मुंढवा, मनपा, घोरपडीमार्गे)४कात्रज - सासवड (कोंढवा हॉस्पिटल, बोपदेवघाट, भिवरीमार्गे)४वडगाव मावळ - चाकण (तळेगाव स्टेशन, म्हाळुंगेमार्गे)४भोसरी - वाघोली (विश्रांतवाडी, धानोरी, लोहगावमार्गे)४घोटवडे फाटा - पिंपरी रोड (कस्पटेवस्ती, हिंजवणी, शेळकेवाडी फाटामार्गे)पीएमपीतर्फे पुढीलनवीन १२ मार्ग सुरू करणारभोसरी - वाघोली (विश्रांतवाडी,लोहगावमार्गे)भोसरी - पाबळ फाटा ( चाकण,शिक्रापूरमार्गे)वडगाव मावळ -चाकण (तळेगाव स्टेशन, इंदोरी, म्हाळुंगेमार्गे)मुकाई चौक - हिंजवडी (रावेत,पुनावळे, डांगे चौकमार्गे),वडगाव मावळ -हिंजवडी (सोमाटणे, विकासनगर, भूमकर चौकमार्गे)कात्रज - सासवड (बोपदेव घाटमार्गे )वारजे माळवाडी- केशवनगर मुंढवा (कोरेगाव पार्कमार्गे)चिंचवड गाव - कोथरुड स्टॅण्ड (डेक्कन, औंध, डांगे चौकमार्गे)स्वारगेट- उंड्री (महंमदवाडी, देसाई हॉस्पिटल, हडपसर, मंडईमार्गे)हडपसर - वाघोली (थेऊर, कोलवडी, साष्टेमार्गे)स्वारगेट - वाघोली (मगरपट्टा सिटी)घोटवडे फाटा - पिंपरी रोड (शेळकेवाडी फाटा, माण, हिंजवडीगाव)

टॅग्स :PMPMLपीएमपीएमएल