शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

बिनव्याजी कर्जाचा मोह पडला महागात; साडेसहा लाखांना गंडा; मोशी येथील प्रकार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2020 19:52 IST

आरोपींनी संगनमत करून फिर्यादी यांना फोन करून आपण बजाज फायनान्स कंपनीच्या मुंबई कार्यालयातून बोलत असल्याचे सांगितले.

पिंपरी : फायनान्स कंपनीतून बोलत असल्याचे सांगून शून्य टक्के व्याजदराने १५ लाख रुपयांचे कर्ज देण्याचे आमिष दाखविले. त्यानंतर दोघांकडून सहा लाख ६७ हजार रुपये घेतले. मात्र कर्ज मंजूर केले नाही. गंधर्वनगरी मोशी येथे फेब्रुवारी २०१९ ते ८ नोव्हेंबर २०२० या कालावधीत घडला.

बापूगौडा महादेवअप्पा पोलीस पाटील (वय २६, रा. गंधर्वनगरी, मोशी) यांनी याबाबत रविवारी (दि. २९) एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अली अनिस मोहम्मद मुमताज (रा. श्रीराम पाडा, भांडुप, मुंबई) आणि एका अनोळखी इसमाच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. 

आरोपींनी संगनमत करून फिर्यादी पोलीस पाटील यांच्या मोबाईलवर फोन करून आपण बजाज फायनान्स कंपनीच्या मुंबई कार्यालयातून बोलत असल्याचे सांगितले. शून्य टक्के व्याजदराने १५ लाख रुपयांचे कर्ज मंजूर करून देतो, असे सांगून वेगवेगळ्या कारणांसाठी फिर्यादी यांच्याकडून तीन लाख ६७ हजार रुपये आणि त्यांचे मित्र गुरुलिंगय्या स्वामी यांच्याकडून तीन लाख रुपये वेगवेगळ्या बँक खात्यावर भरण्यास सांगितले.फिर्यादी आणि त्यांच्या मित्राने पैसे भरल्यानंतर आरोपींनी त्यांचे कर्ज मंजूर न करता तसेच खात्यावर भरलेले पैसे परत न करता विश्वासघात करून सहा लाख ६७ हजारांची आर्थिक फसवणूक केली.

टॅग्स :moshiमोशीfraudधोकेबाजीPoliceपोलिस