शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

सांगा, शाळेत आम्ही खेळायचं कुठं?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2018 01:38 IST

महापालिकेच्या ३० शाळांना खेळाची मैदाने नाहीत. त्यामुळे मुलांनी खेळायचे कुठे असा प्रश्न निर्माण झाला आहे.

पिंपरी : महापालिकेच्या ३० शाळांना खेळाची मैदाने नाहीत. त्यामुळे मुलांनी खेळायचे कुठे असा प्रश्न निर्माण झाला आहे. गेल्या काही वर्षांपासून या शाळांमध्ये पीटी शिक्षकांचीही भरती करण्यात आलेली नाही. परिणामी महापालिकेच्या शाळेतून चांगले खेळाडू घडण्यास अडथळा होत आहे.अनेक शाळा भौतिक सोयीसुविधांपासून वंचित आहेत. अनेक शाळांना संरक्षक भिंत नाही. मैदाने नसल्याने विद्यार्थ्यांची खेळण्यासाठी कुचंबणा होत आहे. केंद्र सरकारकडून खेळासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. त्याचबरोबर मिशन आॅलिम्पिक २०२४ साठी ७५० मुलांची निवड करण्यात आली आहे. प्रत्येक खेळाडूवर प्रत्येक वर्षी १० लाख रुपये एवढा खर्च करण्यात येतो. एवढा खर्च शासन खेळाडूंवर करीत असताना आपल्या शहरातील प्राथमिक शाळेत खेळासाठी क्रीडांगणे नसणे ही बाब गंभीर आहे.शहरातील अनेक खेळाडू विभागीय, राज्य तसेच राष्ट्रीयस्तरावर चमकले आहेत. मात्र ही संख्या हाताच्या बोटावर मोजण्याइतकी आहे. आपल्याकडील विद्यार्थ्यांमध्ये चांगले खेळाडू होण्याची क्षमता असूनही केवळ क्रीडांगणे नसल्याने विद्यार्थ्यांना आवड असूनही खेळाचा सराव करता येत नाही. त्यात भर पीटी शिक्षक नसल्याने अजूनच खेळाकडे दुर्लक्ष केले जात आहे. महापालिका शाळेतील मुलांना खेळासाठी मैदाने उपलब्ध झाली तर ते नक्कीच चांगली प्रगती करतील. याचा विचार करून महापालिका शिक्षण विभागाने मुलांना खेळासाठी मैदाने उपलब्ध करून देण्याची आवश्यकता आहे.>पालकांमध्ये नाराजीमहापालिका शाळांच्या एकूण ८४ इमारती आहेत. या इमारतीमधील ५४ इमारतींना सध्या क्रीडांगण उपलब्ध आहे. तर ३० इमारतींना क्रीडांगण नसल्याचे समोर आले आहे. मैदान उपलब्ध नसल्याने मुलांना खेळाचा सराव करता येत नाही. खेळातील नैपुण्य दाखविण्यासाठी खेळाडूंना वाव मिळत नसल्याने विद्यार्थी व पालकांमधून नाराजीचा सूर उमटत आहे. एकीकडे शासन शालेय जीवनातून खेळाडू घडावेत यासाठी प्रयत्न करत आहे. यासाठी विविध स्पर्धा घेत असताना शाळांना खेळाचे मैदानच नसल्याने खेळाडू घडणार कसे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.>शिक्षण समितीच्या वतीने शाळांची पाहणी सुरू आहे. मुलांच्या जीवनामध्ये खेळाचे महत्त्व अनन्यसाधारण असे आहे. जागा उपलब्ध नसल्याने मैदानांची गैरसोय होत आहे. मात्र ज्या शाळांमध्ये क्रीडांगणे नाहीत अशा शाळांना पर्यायी व्यवस्था केली जाणार आहे. त्याचप्रमाणे पीटी क्षिक्षकांची लवकरच नियुक्ती केली जाणार आहे.- सोनाली गव्हाणे, सभापती शिक्षण समिती, पिं. चिं. महापालिका.

टॅग्स :Studentविद्यार्थी