शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

तुम्हीच सांगा,गणपतीचे विसर्जन कुठे करायचे ? प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभाराविरोधात शिवसेना आक्रमक  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2020 21:00 IST

शहरातील दीड दिवसाच्या गणपतीचे विसर्जन करताना नागरिकांचे प्रचंड हाल झाले..

ठळक मुद्देप्रभागनिहाय मुर्तीदानाबाबत नियोजनाची मागणी 

पिंपरी : महापालिकेने कोरोना परिस्थितीची जाणीव असतानाही गणेश विसर्जनाची कोणतीही सोय केली नाही. प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभाराविरोधात शिवसेनेने आज (सोमवारी) महापालिका मुख्यालयासमोर आंदोलन केले. विसर्जन घाट व पूर्वीचे महापालिकेने बांधलेले विसर्जन हौद बंद केले. शहरात फिरत्या हौदांची कोठेही व्यवस्था केली नाही, मूर्तिदान उपक्रमाचे ढिसाळ नियोजनामुळे सांगा गणपतीचे विसर्जन कुठे करायचं,असा सवाल शिवसेनेच्या पदाधिकारी व नगरसेवकांनी केला. 

शिवसेनेच्या आंदोलनानंतर संध्याकाळपर्यंत मुर्तीदानाबाबत प्रभागनिहाय नियोजन करण्याचे आश्वासन अतिरिक्त आयुक्त अजित पवार यांनी शिवसेनेच्या शिष्टमंडळाला दिले. जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे, शहरप्रमुख योगेश बाबर, माजी आमदार गौतम चाबुकस्वार, महिला संघटिका उर्मिला काळभोर, चिंचवड विधानसभा प्रमुख अनंत को-हाळे, विश्वजित बारणे, सरिता साने, अजित तुतारे, संतोष सौंदणकर, बाळासाहेब वाल्हेकर आदी आंदोलनात सहभागी झाले.

शहरातील दीड दिवसाच्या गणपतीचे विसर्जन करताना नागरिकांचे प्रचंड हाल झाले. त्यामुळे शिवसेनेने दान घेतलेल्या मुर्ती  विसर्जनासाठी प्रशासनाकडे आज आंदोलनाद्वारे सुपूर्द केल्या आहेत, असे गजानन चिंचवडे यांनी सांगितले.----------------महापालिकेने मुर्ती विसर्जनासाठी शहरात कोणत्याही प्रकारची सोय केलेली नाही. शेजारील पुणे पालिकेने विसर्जनासाठी फिरते हौद केले आहेत. मुर्तीदान उपक्रम राबविला जात आहे. पण, पिंपरी पालिकेने कोणतीही व्यवस्था केली नाही. महापालिका प्रशासन केवळ निविदा प्रक्रियेत गुंतले आहे. कोरोना परिस्थितीची जाणीव असतानाही या अधिका-यांचा नियोजनशून्य कारभार आहे. गणेशभक्तांच्या भावनांशी न खेळता तातडीने प्रभागनिहाय मुर्ती विसर्जनाचे नियोजन करावे. - श्रीरंग बारणे, खासदार,शिवसेना-------------------

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडShiv Senaशिवसेनाshravan hardikarश्रावण हर्डिकरCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसGanesh Mahotsavगणेशोत्सव