शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

Chinchwad By Election: चिंचवडमध्ये १२ ईव्हीएम मशीनमध्ये तांत्रिक बिघाड

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2023 16:51 IST

अभियंत्यांनी तात्काळ या मशिन दुरूस्त केल्या

पिंपरी : चिंचवड पोटनिवडणुकीसाठी मतदारसंघामध्ये ५१० केंद्रांवर मतदान प्रक्रिया सुरू आहे. यावेळी विविध ठिकाणच्या केंद्रांवर १२ ईव्हीएम मशिन बंद पडल्या. मात्र, शीघ्र कृती दलाने तात्काळ धाव घेत दुरुस्ती केल्याने मतदान प्रक्रिया सुरळित सुरू राहिली. चिंचवड पोटनिनडणुकीसाठी मतदानाची प्रक्रिया सुरू आहे. दुपारी तीन वाजेपर्यंत ३० टक्के मतदान झाले आहे. काही ठिकाणी मतदान यंत्रामध्ये बिघाड झाल्याची तक्रार कक्षाकडे आली होती. त्यानुसार शीघ्र कृती दलाने तात्काळ धाव घेत तेथील यंत्रांची दुरूस्ती केली. ईव्हीएममध्ये बहुतांश वेळा बॅटरी संपण्याचे किंवा वीजपुरवठा विस्कळीत झाल्यामुळे ईव्हीएममध्ये व्यत्यय येतो. त्यामुळे मतदान प्रक्रिया बंद होते. अशावेळी शीघ्र कृती दलाकडून त्याची तात्काळ दुरुस्ती केली जाते. शीघ्र कृती दलामध्ये ईव्हीएम दुरुस्ती करण्यासाठी अभियंते असतात. तसेच निवडणूक विभागाचे कर्मचारी असतात. त्यांच्यासोबत नवीन बॅलेट युनिट, व्हीव्हीपॅट उपलब्ध असतात. अभियंत्यांच्या माध्यमातून तात्काळ यंत्रांची दुरुस्ती केली जाते. मतदान सुरू असताना काही विविध केंद्रांवर १२ यंत्र बंद पडल्याच्या घटना घडल्या. त्यावर निवडणूक विभागाने तात्काळ कार्यवाही केली. त्यामुळे कोणत्याही केंद्रावर निवडणूक प्रक्रिया बंद न पडल्याचा दावा अधिकाऱ्यांनी केला आहे. 

१२ यंत्रे बंद पडण्याची सूचना विभागाला प्राप्त झाली होती. त्यावर शीघ्र कृती दलाने तात्काळ कारवाई केली. काही मशिनमध्ये बॅटऱ्यांची अडचण आली होती. तर काहींमध्ये कनेक्शनची अडचण होती. अभियंत्यांनी तात्काळ या मशिन दुरूस्त केल्या. त्यामुळे मतदान प्रक्रिया सुरळित सुरू झाली.  - किरण गायकवाड, जनसंपर्क अधिकारी.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडElectionनिवडणूकPoliticsराजकारण