शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

शंभर महिला वाहनचालकांची टीम, महापालिकेचा उपक्रम, प्रवास सुरक्षित होण्यासाठी देणार वाहन चालविण्याचे प्रशिक्षण  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2017 03:10 IST

पिंपरी-चिंचवड, हिंजवडी आणि पुण्यात विविध ठिकाणी काम करणाºया महिलांचा प्रवास अधिक सुरक्षित करण्याच्या दृष्टीने महिलांनाच वाहतूक सेवेत सामावून घेण्याचा अभिनव उपक्रम हाती घेण्याचा निर्णय स्थायी समितीने घेतला आहे. गरजू १०० महिलांना वाहन चालवण्याचे प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगार उपलब्ध करून दिला जाणार आहे.

पिंपरी : पिंपरी-चिंचवड, हिंजवडी आणि पुण्यात विविध ठिकाणी काम करणाºया महिलांचा प्रवास अधिक सुरक्षित करण्याच्या दृष्टीने महिलांनाच वाहतूक सेवेत सामावून घेण्याचा अभिनव उपक्रम हाती घेण्याचा निर्णय स्थायी समितीने घेतला आहे. गरजू १०० महिलांना वाहन चालवण्याचे प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगार उपलब्ध करून दिला जाणार आहे.एक लाखापर्यंत वार्षिक उत्पन्न असणाºया शहरातील रहिवासी महिलेला मोफत, तर दोन लाखांपेक्षा अधिक उत्पन्न असलेल्या महिलेला २५ टक्के शुल्क आकारून वाहन चालवण्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे, अशी माहिती स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे यांनी दिली.पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने शहरातील महिलांसाठी विविध कल्याणकारी योजना राबविल्या जातात. त्या अंतर्गत महिलांना चारचाकी वाहन चालवण्याचे प्रशिक्षण देण्याच्या खर्चाला मंजुरी देण्याचा प्रस्ताव प्रशासनाने स्थायी समिती सभेपुढे मंजुरीस ठेवला होता. या प्रस्तावात दोन लाख रुपये वार्षिक उत्पन्न असलेल्या महिलांनाच हे प्रशिक्षण देण्याची अट घातली होती. त्याऐवजी एक लाखापर्यंत वार्षिक उत्पन्न असलेल्या महिलांना मोफत आणि दोन लाखापर्यंत वार्षिक उत्पन्न असणाºया महिलांना २५ टक्के शुल्क आकारून महापालिकेच्या वतीने वाहन चालवण्याचे प्रशिक्षण देण्याचा आणि त्यासाठी येणाºया खर्चाला मंजुरी दिली.वाहन चालवण्याचे केवळ प्रशिक्षण न देता महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्याचाही निर्णय घेतल्याचे सावळे यांनी सांगितले. महापालिकेच्या वतीने प्रशिक्षण घेतलेल्या महिलांना वाहतूक सेवेत सामावून घेतले जाणार आहे. प्रशिक्षण घेतलेल्या १०० महिलांची टीम तयार करून त्यांना ओला, उबेर यांसारख्या वाहतूक क्षेत्रातील खासगी कंपन्यांमध्ये वाहनचालक म्हणून काम मिळवून देण्यासाठी महापालिकेमार्फत प्रयत्न केले जाणार आहेत. पिंपरी-चिंचवड, पुणे, तसेच हिंजवडीसारख्या भागात काम करणाºया महिलांना कामाच्या ठिकाणी जाण्यासाठी महिला वाहनचालक उपलब्ध व्हावेत, असा उद्देश असल्याचे सावळे यांनी सांगितले.महापालिकेने विविध संस्था व कंपन्यांच्या सहकार्यातून हा उपक्रम राबवल्यास गरजू महिलांना रोजगार उपलब्ध होणार आहे. तसे झाल्यास महापालिकेच्या वतीने वाहन चालवण्यासाठी दिल्या जाणाºया प्रशिक्षणाचा उद्देश सफल होईल. वाहन चालवण्याच्या क्षेत्रात महिलांची संख्या वाढवण्याचा प्रयत्न आहे. महिला प्रवाशांसाठी महिला वाहनचालक उपलब्ध झाल्यास ही अभिमानाची गोष्ट ठरणार आहे. तसेच विविधठिकाणी काम करणाºया महिलांचा प्रवास अधिकाधिक सुरक्षित होईल. आयुक्तांनाही या उपक्रमासाठी स्वतंत्र अ‍ॅप विकसित करण्याची सूचना अधिकाºयांना केली आहे. - सीमा सावळे, स्थायी समिती अध्यक्ष

टॅग्स :Puneपुणे