शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: अंबरनाथच्या उड्डाण पुलावर भीषण अपघात; कारने बाईकस्वार तिघांना उडवले, चौघांचा मृत्यू
2
पत्नीही हवाई दलात पायलट, दुबई एअर शोमधील तेजसच्या शहीद पायलटचे लग्नही दुबईलाच झालेले...
3
IT कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! आता दर महिन्याच्या ७ तारखेपर्यंत पगार करावाच लागणार; नव्या कायद्यात काय काय...
4
नवा कामगार कायदा...! आता १ वर्षानंतर मिळणार ग्रॅच्युइटी; ५ वर्षांची अट बदलली...
5
पायलट 'निगेटिव्ह-जी ॲक्रोबॅटिक' युद्धाभ्यास करायला गेला अन्...; दुबई एअर शोमध्ये 'तेजस' विमान अपघाताचे कारण समोर आले...
6
भारतीय ज्युनियर महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकावर लैंगिक छळाचा आरोप; क्रीडा मंत्रालयाने चौकशीचे दिले आदेश
7
“भाजपाच्या रविंद्र चव्हाणांमुळे इथे युती तुटली, कोणता राग आहे माहिती नाही”: निलेश राणे
8
हिडमाचा खात्मा बनावट चकमकीत ? माओवाद्यांचा पत्रकातून गंभीर आरोप
9
वर्षाच्या अखेरीस आणखी एक महामारी येणार! नॉस्ट्राडेमसचे भाकित काय? जाणून घ्या
10
ऐतिहासिक निर्णय! देशात चार नवे कामगार कायदे तात्काळ लागू; २९ जुने कायदे रद्द, श्रम धोरणाला आधुनिक स्वरूप
11
धक्कादायक! पत्नीने प्रियकरासाठी लग्नाच्या सातव्या दिवशी पतीची हत्या केली
12
उद्धव ठाकरेंचा भाजपाला मोठा धक्का; ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत बडा नेत्याच्या हाती शिवबंधन
13
IND A vs BAN A : 'सुपर ओव्हर'मध्ये भारताचा फ्लॉप शो! एकही चेंडू न खेळता बांगलादेशनं गाठली फायनल
14
“मालेगाव प्रकरणी आरोपीला फाशी द्या, राज्यात महिला मुलींची सुरक्षा रामभरोसे”: हर्षवर्धन सपकाळ
15
बिहारमध्ये भाजपाचा डाव! नितीश कुमारांना मुख्यमंत्रीपद दिलं पण, गृहमंत्रीपद स्वतः कडे ठेवले, २० वर्षांनंतर खाते सोडले
16
कर्नाटकच्या राजकारणात खळबळ! "सर्व १४० आमदार माझ्यासोबत", डी. के. शिवकुमार यांचे थेट विधान
17
तुम्हाला तुमची गाडी खूपच प्यारी आहे...! २० वर्षांहून जुन्या वाहनांच्या फिटनेस टेस्ट शुल्कात १५ पट वाढ
18
स्लीपर वंदे भारत देशभर फिरवली, ट्रायलनंतर परत पाठवली; ५ फॉल्ट समोर आले, लोकार्पण लांबणार?
19
फेस्टीव्ह संपला नाही तोच...! फ्लिपकार्ट 'ब्लॅक फ्रायडे सेल २०२५' ची तारीख ठरली, अमेझॉन थांबतेय होय...
20
'G-20 मध्ये सामील होणार नाही', डोनाल्ड ट्रम्प दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्षांवर नाराज, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

जमिनींचा शेतीऐवजी विनापरवानगी वापर करणारे 'रडार'वर; महसूल विभागाकडून नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2021 16:57 IST

दंडाची रक्कम न भरल्यास सातबारा उताऱ्यावर बोजा चढविण्यात येणार

ठळक मुद्देदंडाची रक्कम न भरल्यास सातबाऱ्यावर होणार बोजाची नोंद

पिंपरी : कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता जमिनीचा अनधिकृत अकृषक वापर केल्याप्रकरणी महसूल विभागाकडून मिळकतधारकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. त्याबाबत महसूल विभागाकडून नोटीस बजावण्यात आल्या आहेत. दंडाची रक्कम न भरल्यास सातबारा उताऱ्यावर बोजा चढविण्यात येणार आहे. 

पिंपरी-चिंचवड अपर तहसीलदार कार्यालयाकडून महसूल वसूल करण्यावर भर देण्यात आला आहे. मात्र कृषक अर्थात शेतजमिनींचा शेतीऐवजी इतर कारणांसाठी वापर होत असल्याचे समोर आले आहे. औद्योगिक, रहिवास तसेच व्यवसायासाठी अशा मिळकतींचा वापर होत आहे. संबंधित मिळकतधारकांकडून त्यासाठी परवानगी घेण्यात आलेली नाही. तसेच शासनाचा  महसूल भरण्यात आलेला नाही. त्यामुळे अशा मिळकतधारकांचा शोध घेऊन त्यांच्या मिळकतींची पाहणी करण्यात येत आहे. त्यात काहींनी जमिनीचा अकृषक कारणांसाठी अनधिकृत वापर केल्याचे समोर आले. त्यामुळे अशा मिळकतधारकांना दंड आकारण्यात आला. त्यांना त्याबाबत नोटीस बजावून जमीन महसुलाची मागणी करण्यात आली.   

कार्यवाहीचा दुसरा टप्पा म्हणून तहसीलदार कार्यालयाकडून नोटीस क्रमांक दोनही देण्यात आली आहे. मिळकतधारकाने तलाठी यांच्याकडे जमिनीचे कागदपत्र तसेच भाडेपट्टा करार असल्यास सादर करावा. त्यानुसार दंड आकारण्यात येणार आहे. मात्र तरीही रक्कम न भरल्यास नोटीस क्रमांक तीन बजावण्यात येऊन सातबारा उताऱ्यावर बोजाची नोंद होईल. चिखली, कुदळवाडीतील मिळकतधारकांचा विरोधनोटीस बजावण्यात आल्याने चिखली, कुदळवाडी भागातील मिळकतधारकांनी याला विरोध केला होता. कोरोना महामारीमुळे उद्योग-व्यवसाय अडचणीत असल्याचे सांगून या नोटीस मागे घेण्यात याव्यात, अशी त्यांची मागणी आहे. याबाबत त्यांनी तहसीलदारांकडे निवेदनही दिले आहे.

जागेच्या क्षेत्रफळानुसार व भाडेपट्टा करार असल्यास त्यानुसार दंडाची आकारणी केली जाईल. चिखली व चऱ्होली येथील काही जणांनी दंड भरला आहे. नोटीस बजावलेल्या मिळकतधारकांनी दंड त्वरित भरावा, अन्यथा कारवाई होईल.   - गीता गायकवाड, तहसीलदार 

तहसीलदार कार्यालयाची कारवाईतलाठी सजा - नोटीसबोऱ्हाडेवाडी - ३३चऱ्होली - ३९चोविसावाडी - १८वडमुखवाडी - १८चिखली - ४५भोसरी - १७दापोडी - ४

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड