शहरं
Join us  
Trending Stories
1
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
2
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
3
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
4
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
5
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
6
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
7
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
8
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
9
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
10
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
11
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
12
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
13
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
14
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
15
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
16
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
17
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
18
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
19
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
20
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?

तळेगाव दाभाडेच्या नगराध्यक्षपदी भेगडे

By admin | Updated: October 16, 2015 00:50 IST

तळेगाव दाभाडेच्या नगराध्यक्षपदी शहर विकास समितीच्या माया भेगडे यांची बिनविरोध निवड झाली. शहराच्या परिपूर्ण विकासासाठी आपण सर्वांना विश्वासात घेऊन काम

तळेगाव स्टेशन : तळेगाव दाभाडेच्या नगराध्यक्षपदी शहर विकास समितीच्या माया भेगडे यांची बिनविरोध निवड झाली. शहराच्या परिपूर्ण विकासासाठी आपण सर्वांना विश्वासात घेऊन काम करणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी नगरपालिका सभागृहात गुरुवारी सकाळी साडेअकरा वाजता विशेष सभा झाली. पीठासन अधिकारी सुनील थोरवे यांनी नगर परिषदेच्या अध्यक्षपदासाठी माया तुषार भेगडे यांचा एकमेव अर्ज शिल्लक राहिल्याने आणि तो वैध असल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. मावळत्या नगराध्यक्षा सुलोचना आवारे यांच्याकडून भेगडे यांनी नगराध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली. नगरपालिका प्रशासनातर्फे प्रांताधिकारी थोरवे आणि नगर परिषदेचे मुख्याधिकारी कैलास गावडे यांनी नवनिर्वाचित नगराध्यक्षांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. या वेळी उपनगराध्यक्ष सत्येंद्रराजे दाभाडे, ज्येष्ठ नेते बबनराव भेगडे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष गणेश ढोरे व्यासपीठावर उपस्थित होते. नगरपालिकेच्या प्रांगणात शहर विकास समितीच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांच्या आतषबाजीने जल्लोष केला. नगरसेवक गणेश खांडगे, विरोधी पक्षनेते सुनील शेळके, मुकुंदराव खळदे, चंद्रकांत शेटे, सुलोचनाताई आवारे, गणेश काकडे, बबनराव भेगडे, शिक्षण मंडळाचे सभापती ब्रिजेंद्र किल्लावाला, नगरसेविका सुजाता खेर आणि गणेश ढोरे यांनी नूतन नगराध्यक्षांसाठी अभिनंदनपर भाषणे केली. सभागृहात शहर विकास समितीचे सुरेश चौधरी, कृष्णा कारके, अशोक भेगडे, दर्शन खांडगे, सभागृह नेते बापूसाहेब भेगडे, किशोर भेगडे, चंद्रभान खळदे, शालिनी खळदे, सुनंदा मखामले, तनुजा जगनाडे, रंजना भोसले आदी सत्ताधारी नगरसेवकांसह विरोधी पक्षाचे नगरसेवक सुशील सैंदाणे, संतोष लोणकर, अमृता टकले आदी सदस्य उपस्थित होते. कार्यकर्त्यांनी नवनिर्वाचित नगराध्यक्षांची ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक काढली. (वार्ताहर)