शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर कोरियाच्या हेरगिरी उपग्रहाचं प्रक्षेपण अपयशी, उड्डाण करताच काही सेकंदात उडाल्या रॉकेटच्या ठिकऱ्या
2
माजी IAS अधिकाऱ्याच्या पत्नीच्या हत्येचे गूढ उकलले; जवळच्याच लोकांकडून दगाफटका, ३ आरोपींना अटक!
3
"युवासेनेच्या पदाधिकाऱ्याला कोस्टल रोडचे काम"; आदित्य ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर भाजपचे प्रत्युत्तर
4
 प्रचारसभेवेळी राहुल गांधी झाले उकाड्याने त्रस्त, भरसभेत डोक्यावर ओतलं पाणी   
5
"राजकीय पक्ष ही खासगी प्रॉपर्टी नसून..."; अजित पवार गटाचा शरद पवार गटावर निशाणा
6
शालिमार-मुंबई एलटीटी एक्स्प्रेसमधील बंद एसीवरून प्रवाशांचा संताप
7
राज्यातील दुष्काळाच्या मुद्द्यावर काँग्रेस आक्रमक, परिस्थितीच्या पाहणीसाठी विभागवार समित्यांची स्थापना
8
कोस्टल रोडच्या टनेलला गळती, व्हिडिओ समोर येताच CM शिंदे 'इन अॅक्शन'; कायमस्वरुपीच्या दुरुस्तीचे आदेश!
9
WhatsApp युजर्सना खुशखबर! आता मोठे Voice मेसेज पाठवता येणार, जाणून घ्या कसे?
10
India vs Pakistan मध्ये भारतच जिंकेल; पाकिस्तानच्या माजी खेळाडूनं व्यक्त केला विश्वास
11
घरातून एकत्रच पळाल्या ३ मुली; पत्र वाचून कुणीही शोधण्याची हिंमत केली नाही, अखेर...
12
AAP नेत्या आतिशी यांच्याविरोधात कोर्टाने बजावले समन्स, केजरीवालही आहेत आरोपी, जाणून घ्या प्रकरण
13
ट्रेनमध्ये सीट बुक केली, तरीही उभे राहून करावा लागला प्रवास; रेल्वेला ठोठावला १३ हजारांचा दंड!
14
"यामिनी जाधवांकडून सापळेंवर कमिशनचे आरोप"; चौकशीचा ड्रामा कशासाठी म्हणत ठाकरे गटाची टीका
15
अमेरिकेतील संकट बनलं भारतासाठी संधी?; औषध उत्पादक कंपन्यांना मोठा फायदा
16
अमेरिकेत कारच्या धडकेत भारतीय विद्यार्थिनीचा मृत्यू; शिक्षण पूर्ण करुन नोकरीच्या होती शोधात
17
Fact Check: हेलिकॉप्टरला लटकणाऱ्या व्यक्तीचा व्हिडिओ PM मोदींच्या रॅलीचा नसून परदेशातील; जाणून घ्या सत्य
18
BIG Update : अखेर प्रतीक्षा संपली! गौतम गंभीरचं भारताचा 'हेड', महत्त्वाची अपडेट समोर
19
"कायद्याच्या तावडीतून कोणीही सुटू शकत नाही, भारतात येताच प्रज्वल रेवन्ना यांना अटक केली जाईल"
20
Pune Porsche Car Accident: 'बाळा'च्या आजोबांना आणि वडिलांना ३१ मे पर्यंत पोलीस कोठडी; कोर्टात नेमकं काय घडलं?

विधानसभा निवडणुकीतील बंडखोरांवर दोन दिवसात कारवाई : श्रीरंग बारणे

By ऑनलाइन लोकमत | Published: October 09, 2019 3:30 PM

कोणत्याही बंडखोरास पक्षाचे नेते, कार्यकर्ते पाठिंबा देणार नाहीत...

पिंपरी : विधानसभा निवडणूकीत बंडखोरी करणाऱ्यांवर शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या वतीने दोन दिवसात कारवाई होईल, कोणत्याही बंडखोरास पक्षाचे नेते, कार्यकर्ते पाठिंबा देणार नाहीत, अशी भूमिका खासदार श्रीरंग बारणे यांनी पत्रकार परिषदेत जाहिर केली.पिंपरी, चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदार संघातील महायुतीची पत्रकार परिषद झाली. यावेळी खासदार अमर साबळे, शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप, आमदार महेश लांडगे, आमदार गौतम चाबुकस्वार, प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे, आरपीआयच्या नेत्या चंद्रकांता सोनकांबळे, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, शिवसेना जिल्हा प्रमुख गजानन चिंचवडे, शहरप्रमुख योगेश बाबर, प्रदेश प्रतिनिधी उमा खापरे आदी उपस्थित होते.महायुतीच्या वतीने खासदार बारणे यांनी भूमिका जाहीर केली. चिंचवडमधून शिवसेना गटनेते राहुल कलाटे, पिंपरीतून भाजपा नगरसेवक बाळासाहेब ओव्हाळ, तसेच भाजपाच्या नगरसेविका सीमा सावळे यांनी दर्यापूरमधून उमेदवारी कायम ठेवली आहे. बंडखोराबाबत भूमिका काय? यावर  बारणे म्हणाले, पक्षाच्या वतीने कोणीही बंडखोरी केलेली नाही. त्यांना कोणाचीही साथ नाही. महायुतीबरोबरच शिवसेना आहे. भाजपा आणि शिवसेनेचे वरिष्ठ नेते बंडखोराबाबत निर्णय घेणार आहेत. सोनकांबळे म्हणाल्या, आरपीआयची बैठक झाली. त्यानुसार महायुतीतील घटक पक्ष म्हणून आम्ही शिवसेना आणि भाजपाच्या उमेदवारांबरोबर आहोत.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडElectionनिवडणूकvidhan sabhaविधानसभाShiv SenaशिवसेनाBJPभाजपा